Mandira bedi impressive first look poster from saaho released | Mandira is back 'साहो'मधील मंदिरा बेदीचा फर्स्ट लूक आऊट
Mandira is back 'साहो'मधील मंदिरा बेदीचा फर्स्ट लूक आऊट

साहोची रिलीज डेट जस-जशी जवळ येते आहे फॅन्सची उत्सुकता वाढत चालेली आहे. साहोचे मेकर्ससुद्धा ही उत्सुकता आणखी वाढवण्यात कोणतीच कसर सोडत नाहीत. रोज एक-एक दिवस सिनेमातील मुख्य कलाकारांचे फर्स्ट लूक आऊट करण्यात येतायेत. जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, श्रद्धा कपूर आणि नील नितिन मुकेश यांचा फर्स्ट लूक आऊट झाल्यानंतर आता मंदिरा बेदीचा लूक आऊट झाला आहे. सिनेमात मंदिराचं नाव कल्कि आहे. मंदिराचा लूक पाहून तिची सिनेमातील भूमिका नक्कीच लक्ष्यवेधी असेल यात काहीच शंका नाही.   


 मंदिराने 1999 मध्ये निर्माता राज कौशलसोबत लग्न केले. तिला ८ वर्षांचा मुलगा आहे. मंदिरा बेदी सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती तिच्या वर्कआऊटचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. बऱ्याचदा मंदिरा सोशल मीडियावर ट्रोल होते. दिलेल्या एका मुलाखतीत मंदिरानं ट्रोलिंगबद्दल सांगितलं होतं की, लोकांचं ट्रोल करणं हरॅसमेंटसारखे वाटते. तरीदेखील ट्रोलर्सकडे लक्ष न देता  वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर करत असते.. 


साहो'बाबत बोलायचे झाले तर त्यात दमदार अॅक्शन सीन्स बघायला मिळणार आहेत. एक अॅक्शन शूट करण्यासाठी जवळपास 70 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. प्रभास त्याच्या या सिनेमासाठी चांगलीच मेहनत घेतली आहे. सिनेमाचे दिग्दर्शक सुजीत ही प्रत्येक अ‍ॅक्शन सीनकडे बारकाईने लक्ष दिले आहे. प्रत्येक सीनमध्ये प्रभास अतिशय प्रभावशाली दिसला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत.साहो हा सिनेमा भारतातील पहिला बहुभाषी चित्रपट असून एकाच वेळी हिंदी, तेलगू आणि तमिळ या भाषांमध्ये हा शूट केला गेला आहे. 


Web Title: Mandira bedi impressive first look poster from saaho released
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.