mandira bedi get trolled for wishes happy karva chauth with a wine glass | मंदिरा बेदीने अशा दिल्या ‘करवा चौथ’च्या शुभेच्छा, फोटो पाहून नेटक-यांचा संताप

मंदिरा बेदीने अशा दिल्या ‘करवा चौथ’च्या शुभेच्छा, फोटो पाहून नेटक-यांचा संताप

ठळक मुद्देमंदिराने 1999 मध्ये निमार्ता राज कौशलसोबत लग्न केले. तिला ८ वर्षांचा मुलगा आहे.  

गुरुवारी देशभर ‘करवा चौथ’चा सण साजरा झाला. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनीही पारंपरिक पद्धतीने ‘करवा चौथ’चे व्रत केले. सोबत या सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केलेत. अनुष्का शर्मा, शिल्पा शेट्टी, रवीना टंडन, बिपाशा बासू अशा अनेक अभिनेत्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ‘करवा चौथ’ साजरा करताना दिसल्या. अभिनेत्री मंदिरा बेदी हिनेही एक फोटो शेअर करत लोकांना ‘करवा चौथ’च्या शुभेच्छा दिल्यात. पण तिचा फोटो बघताच सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. हा फोटो पाहिल्यानंतर युजर्स इतके भडकले की, त्यांनी मंदिराला अश्लिल भाषेत ट्रोल केले.


मंदिराने पतीसोबतचा फोटो शेअर केला. ‘करवा चौथ’च्या संध्याकाळी शेअर करण्यात आलेल्या या फोटोत मंदिरा साडीत दिसतेय. तिच्या कपाळावर लाल मोठी टिकली दिसतेय. इथपर्यंत सगळे ठीक आहे.  फोटोत आणखी एक गोष्ट दिसली. ती म्हणजे वाईनचे ग्लास. होय, मंदिरा व तिच्या पतीच्या हातात वाईनचे ग्लास आहेत. नेमक्या याच वाईनच्या ग्लासमुळे मंदिरा ट्रोल झाली. मंदिराने वाईनचा ग्लास हातात घेऊन ‘करवा चौथ’च्या शुभेच्छा देणे सोशल मीडिया युजर्सला रूचले नाही. हा फोटो बघताच युजर्सनी तिला प्रचंड ट्रोल केले.

‘करवा चौथ’ साजरा करणार नसशील तर हरकत नाही. पण किमान भारतीय संस्कृतीशी असे धिंडवडे काढू नकोस, असे लोकांनी तिला बजावले. एका युजरने तर तिला चांगलेच फैलावर घेतले. ‘ऐ म्हातारे वेडी झालीस का?’ अशा भाषेत या युजरने मंदिराला ट्रोल केले.
मंदिरा बेदीने 1999 मध्ये निमार्ता राज कौशलसोबत लग्न केले. तिला ८ वर्षांचा मुलगा आहे.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mandira bedi get trolled for wishes happy karva chauth with a wine glass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.