मंदिरा बेदी झगमगत्या दुनियेपासून लांब असली तरी ती तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे जास्त चर्चेत असते. मंदिरा नेहमीच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. ब-याचदा तिला या फोटोंमुळे ट्रोलही केले आहे. परंतु त्याची तमा न बाळगता मंदिरा तिचे फोटो शेअर करत असते. मंदिरा सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लूटत आहे. यादरम्यानच्या तिच्या बिकिनी फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या फोटोमध्ये मंदिरा अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.४७ वर्षांची असलेली मंदिराचा हॉटनेस नक्कीच चकीत करणारा आहे. आता पुन्हा एकदा तिने तिचे खास फोटो शेअर केले आहेत. नुकतेच शेअर  केलेल्या फोटोमध्ये मंदिरा पूलमध्ये मस्त फ्लोटिंग ब्रेकफास्ट करताना पाहायला मिळत आहे. 


मंदिराला ट्रॅव्हल करायला खूप आवडते. त्यामुळे जेव्हा जेव्हा तिला वेळ मिळतो. तेव्हा तेव्हा ती थेट वेगवेगळ्या लोकेशन्सवर व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी जात असते. तुर्तास शेअर केलेल्या या फोटोंत मंदिराने लाल रंगाची बिकिनी परिधान केली आहे. बिकिनीतील तिचे  फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  फिट राहण्यासाठी मंदिरा केवळ जिमवर अवलंबून नाही. स्वीमिंग, योगा असे सगळे काही ती करते. मंदिराचे स्टाइल स्टेटमेंट सर्वांत वेगळे आहे. मग तो इव्हेंट असो वा फंक्शन प्रत्येक ठिकाणी ती एका वेगळ्या अंदाजात बघावयास मिळते.

मंदिरा ब-याचदा गौरव गुप्ताने डिझाइन केलेला ड्रेस परिधान करणे पसंत करते. मंदिराने 1999 मध्ये निर्माता राज कौशलसोबत लग्न केले. तिला ८ वर्षांचा मुलगा आहे.  सध्या मंदिरा ‘साहो’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 


मंदिरा बेदी सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती तिच्या वर्कआऊटचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. बऱ्याचदा मंदिरा सोशल मीडियावर ट्रोल होते. दिलेल्या एका मुलाखतीत मंदिरानं ट्रोलिंगबद्दल सांगितलं होतं की, लोकांचं ट्रोल करणं हरॅसमेंटसारखे वाटते. तरीदेखील ट्रोलर्सकडे लक्ष न देता  वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर करत असते.

Web Title: Mandira Bedi Bikini Photos From Maldives Vacation Is Breaking The Internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.