ठळक मुद्देसुनील शेट्टीची पत्नी माना मुस्लिम असून तिचे खरे नाव माना कादरी आहे.

सुनील शेट्टीने स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. बॉलिवूडच्या सर्वाधिक श्रीमंत स्टार्समध्ये त्याचे नाव घेतले जाते. सुनीलने अनेक चित्रपटांत बिझनेसमॅनची भूमिका साकारली. पण ख-या आयुष्यातही तो मोठा बिझनेसमॅन आहे. त्याच्या कमाईत त्याची पत्नी माना शेट्टी हिचाही मोठा हात आहे. एक यशस्वी उद्योजिका आणि यशस्वी सामाजिक कार्यकर्ता अशी तिची ओळख आहे. मानाबद्दल इतके सांगायचे कारण म्हणजे, आज तिचा वाढदिवस.

मानाने पती सुनील शेट्टीसोबत मिळून एस2 नावाने एक रिअल इस्टेट प्रोजेक्ट सुरु केला होता. या प्रोजेक्टअंतर्गत त्यांनी मुंबईत 21 लक्झरी विला बनवले. याशिवाय माना एक लाईफस्टाईल स्टोरही चालवले. याठिकाणी दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक लक्झरी वस्तू उपलब्ध आहे.

‘सेव द चिल्ड्रेन इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेशी तिचे नाव जोडलेले आहे. या संस्थेसाठी निधी उभा करण्यासाठी माना दरवर्षी इव्हेंट घेते. यातून आलेला पैसा या संस्थेला दिला जातो.
इंटरनेटवर उपलब्ध आकडेवारीनुसार, सुनील शेट्टी वर्षाकाठी 150 कोटींची कमाई करतो. यात मानाचा मोठा वाटा आहे.

पेस्ट्री शॉपपासून सुरु झाली होती लव्हस्टोरी

सुनील शेट्टीची पत्नी माना मुस्लिम असून तिचे खरे नाव माना कादरी आहे. सुनील शेट्टी आणि मानाची लव्हस्टोरी एक पेस्ट्री शॉपपासून सुरु झाली होती. येथे सुनीलने पहिल्यांदा मानाला पाहिले आणि पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. मानाच्या जवळ जाण्यासाठी सुनीलने सर्वप्रथम मानाच्या बहिणीला  मैत्रीण बनवले. मानाच्या बहिणीने दोघांची भेट घालून दिली आणि सुनीलने अगदी फिल्मी स्टाइलने मानाला प्रपोज केले होते. मानानेसुध्दा लगेच होकार दिला.  दोघांनी 9 वर्षे एकमेंकांना डेट केले. 1991मध्ये दोघांनी लग्न केले. दोघांना मुलगी अथिया आणि मुलगा अहान आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mana shetty birthday special wife of suniel shetty unknown facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.