Man trolls Amitabh Bachchan, writes 'I hope you die with this COVID'; Big B gives a befitting reply | कोरोनाने मेलास तर बरा...! हेटर्सच्या या वाक्याने कधी नव्हे इतके भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले ठोक दो...

कोरोनाने मेलास तर बरा...! हेटर्सच्या या वाक्याने कधी नव्हे इतके भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले ठोक दो...

ठळक मुद्देअमिताभ यांचा हा ब्लॉग सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत. गेल्या 11 जुलैला अमिताभ यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. तेव्हापासून ते रूग्णालयात आहेत. अशात बिग बी यांचे चाहते, बॉलिवूडकर ते लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करत आहेत. मात्र काही असेही लोक आहेत,जे अशास्थितीत अमिताभ यांच्याबद्दल अपशब्दांचा वापर करत आहेत. अशा लोकांवर अमिताभ यांनी संताप व्यक्त केला आहे.
अलीकडे एका युजरने अमिताभ यांच्यासाठी नको ते लिहिले. ‘माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही कोरोनामुळे मरावे,’ असे या व्यक्तिने लिहिले. खुद्द अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगममध्ये याची माहिती देत आपला संताप व्यक्त केला आहे.


या व्यक्तिला अमिताभ यांनी चांगलेच सुनावले. ‘मिस्टर अज्ञात, तू तर तुझ्या वडिलांचे नावही लिहिलेले नाहीस. कदाचित तुझे वडिल कोण हे तुला ठाऊक नसावे. दोन गोष्टी घडू शकतात. एक मी जिवंत राहील किंवा मरेन. पण मी मेलोच तर तू एका सेलिब्रिटीवर भडास काढण्याची, त्याची निंदा करू शकणार नाहीस. तू लिहिलेले लोकांच्या लक्षात आणू देणारा अमिताभ त्यावेळी जिवंत नसेल. मात्र हो, परमेश्वराच्या कृपेने मी जगलोच तर तुला लोकांचा प्रचंड राग सहन करावा लागेल. केवळ माझाच नाही माझ्या 9 कोटी फॉलोअर्स तुझ्यावर तुटून पडतील. तुला माहित असेलच की, माझे चाहते जगभरात आहेत. प्रत्येक कोप-यात. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि ही केवळ पेजची ईएफ नाही अर्थात एक्सटेंडेड फॅमिली नाही तर एक्सटर्मिनेशन फॅमिली आहे. ठोक दो साले को, मला फक्त त्यांना एवढे सांगायची देर आहे...’


आपल्या ब्लॉगच्या शेवटी त्यांनी लिहिले, मारीच, अहिरावन, महिषासूर, असूर आहेस तू. आमचा यज्ञ सुरु होताच तू राक्षसासारखा तडफडशील. चरित्रहिन, अविश्वासी, श्रद्धाहिन आहेस तू. जलो गलो पिघलो, बेशर्म, बेहया, निर्लज्ज, समाज कलंकी...
अमिताभ यांचा हा ब्लॉग सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Man trolls Amitabh Bachchan, writes 'I hope you die with this COVID'; Big B gives a befitting reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.