ठळक मुद्दे2002 मध्ये आलेला ममताचा 'कभी तुम, कभी हम' हा सिनेमा शेवटचा ठरला. पण हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच बॉलिवूडमधून गायब झाली.

ममता कुलकर्णीने 1992 मध्ये आलेल्या 'तिरंगा' या सिनेमातून आपल्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ममताने 'मेरा दिल तेरे लिए' या सिनेमात काम केले होते. पण तिला खरी ओळख मिळाती ती 1993 मध्ये आलेल्या 'आशिक आवारा' या सिनेमामुळे मिळाली होती. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले. चित्रपटात काम करताना ममता तिच्या अभिनयापेक्षा बोल्ड लूकमुळे अधिक चर्चेत आली होती. 

ममताने 1993 च्या सप्टेंबरच्या स्टारडस्टच्या अंकासाठी टॉपलेस शूट केले होते. त्या काळात या फोटोशूटमुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. ममता नेहमीच कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये राहिली. ती आता अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. ममताने अचानक बॉलिवूडमधून एक्झिट घेण्याचे कारण तिच्या आयुष्यात झालेली विकी गोस्वामीची एन्ट्री होती असे म्हटले जाते. विकीचं खरं नाव विजयगिरी गोस्वामी. विकी हा गुजरातमध्ये डीसीपी राहिलेल्या आनंदगिरी गोस्वामी यांचा मुलगा आहे. असे सांगितले जाते की, पटकन पैसे कमवण्यासाठी त्याने गुजरातमध्ये दारूची आणि ड्रग्सची तस्करी सुरु केली होती. त्यानंतर विकी मुंबईत आला आणि इथे त्याने ड्रग्सचा बिझनेस सुरू केला. त्यावेळी त्याचे अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत मैत्रीचे संबंध होते. याचवेळी ममताच्या टॉपलेस फोटोमुळे आणि हिट सिनेमांमुळे ती चर्चेचा विषय बनली होती. त्याचकाळात तिचं नाव विकीसोबत जोडलं गेलं. त्यानंतर तिचं बॉलिवूड करिअर संपलं. 2002 मध्ये आलेला ममताचा 'कभी तुम, कभी हम' हा सिनेमा शेवटचा ठरला. पण हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच बॉलिवूडमधून गायब झाली.

विकीसोबतच ममतावर ड्रग्स तस्कीराचा आरोप असून तिच्यावर कोर्टात केसदेखील सुरू आहे. या केसच्या संदर्भात ममताविरोधात वॉरंटदेखील निघाले होते. 2013 मध्ये केन्या पोलिसांनी विकीला अटक देखील केली होती. त्यानंतर काहीच वर्षांत त्याची सुटका झाली. याच दरम्यान ममता आणि विकीने लग्न केले असे म्हटले जाते. काही वर्षांपूर्वी एका ड्रग्स तस्करीत विकीचे नाव आले होते. त्यावेळी विकीने त्याने ममताशी लग्न केले नाही असे सांगितले होते. तसेच ममताने देखील अनेक वर्षांनंतर मीडियासमोर येऊन तिच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे असून ड्रग्स तस्कारीशी तिचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते. 

Web Title: mamta kulkarni unrecognizable in this pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.