रेशीमगाठी स्वर्गातच जुळतात असं म्हटलं जातं. लग्नबंधनात अडकलेले दाम्पत्य हाच जन्म नाही तर सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात. मात्र चंदेरी दुनियेतील काही सेलिब्रिटी याला अपवाद ठरतात. अनेक कलाकारांची लग्न फार काळ टिकली नसल्याची उदाहरणं आहेत. काही ना काही खटके उडाल्यानंतर ही सेलिब्रिटी मंडळी आपल्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत. मात्र सेलिब्रेटींसाठी घटस्फोट सगळ्यात खर्चीक असते. घटस्फोट घेतल्यानंतर अनेक अभिनेत्यांच्या पत्नींनी त्यांच्याकडून कोटींची पोटगीही घेतली आहे.

फरहान खान

फरहान खानने पत्नी अधुना भंबानी 2017 मध्ये घटस्फोट घेतला होता. 16 वर्षानंतर या दोघांनी आपले नाते संपवले तेव्हा अधुनाने फरहानचे मुंबईतील घर तिच्या नावावर करण्याची मागणी केली.बांद्रा येथील बँड स्टँड परिसरात 10 हजार स्के.फिट बंगल्यात दोघे राहत होते. तसेच फरहानने मुलांच्या पालनपोषणासाठी भली मोठी रक्कमही अधुनाला दिली होती.

हृतिक रोशन


हृतिक रोशनने 2012 मध्ये सुजैन खानला घटस्फोट दिला होता. हा घटस्फोट दिल्यानंतर सुजैनला 360 कोटी रू दिले होते.

संजय दत्त


संजय दत्तची दुसरी पत्नी  रिया पिल्लईने  संजय दत्तकडून अपार्टमेंट आणि महागडी गाडी घेतली होती.इतकेच नाहीतर  वेगळे झाल्यानंतर संजयला रियाचे बिलं ही भरावी लागायची.

आमिर खान


आमिर खानने रीना दत्ताला घटस्फोट दिल्यानंतर त्याच्याकडून 50 कोटींची पोटगी घेतली होती.रीना आणि आमिरची दोन मुलं आहेत. त्यानंतर आमिरने किरण रावसह लग्न केले.

सैफ अली खान


अमृता सिंहला सैफने 5 कोटी रू दिले होते. इतकेच नाही तर दोन्ही मुलं 18 वर्षाचे होत नाही तोपर्यंत त्यांचा सगळा खर्च सैफने केला त्यासाठी त्याने 1 लाख रू. महिना द्यायचा.
 

अरबाज खान 


सर्वाधिक चर्चित असलेले ब्रेकअप मलायका अरोरा  आणि  अरबाज खान यांचे आहे. अरबाजने मलायकाला 10 ते 15 कोटी रू दिल्याचे सांगितले जाते. 

Web Title: Malika Arora To Saif Ali Khan These Are the Most Expensive Divorces In Bollywood they Make for Explicit Headlines in media-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.