ठळक मुद्देऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर उस्मान अफजलसोबत अमृता नात्यात होती. त्या दोघांना अनेकवेळा एकत्र फिरताना पाहाण्यात आले होते. एवढेच नव्हे तर ते दोघे मीडियातदेखील एकमेकांविषयी बिनधास्तपणे बोलत असत.

मलायका अरोराची बहीण अमृता अरोराने कितने दूर कितने पास या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील करियरला सुरुवात केली. यानंतर तिने आवारा पागल दीवाना, हॅलो, गोलमाल रिटर्न्स यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. कुछ तो है तेरे मेरे दरमियाँ हा तिचा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. पण त्यानंतर ती कोणत्याच चित्रपटात झळकली नाही. अमृताला बॉलिवूडमध्ये तितकेसे यश मिळाले नसल्याने तिने अभिनयक्षेत्रापासून दूर राहाणेच पसंत केले. अमृता चित्रपटात काम करत नसली तरी सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. 

अमृता अरोरा तिची बहीण मलायकासोबत अनेक समारंभ, पार्टींमध्ये दिसते. एवढेच नव्हे तर करिना कपूर ही तिची बेस्ट फ्रेंड असून तिच्या या लाडक्या मैत्रिणीसोबत ती अनेकवेळा आपल्याला दिसते. अमृताचे लग्न शकील लडकसोबत झाले असून तो एक व्यवसायिक आहे. शकीलसोबत लग्न करण्याआधी अमृताचे एक प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. अमृता एका क्रिकेटरसोबत नात्यात होती आणि तिने ही गोष्ट अनेकवेळा सांगितली देखील होती.

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर उस्मान अफजलसोबत अमृता नात्यात होती. त्या दोघांना अनेकवेळा एकत्र फिरताना पाहाण्यात आले होते. एवढेच नव्हे तर ते दोघे मीडियातदेखील एकमेकांविषयी बिनधास्तपणे बोलत असत. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, मला विश्वास आहे की, तो केवळ माझ्यासाठी बनला आहे आणि योग्य वेळ येईल त्यावेळी आम्ही आमच्या नात्याला कायदेशीर मान्यता देऊ... कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात काही वर्षांपूर्वी मलायका अरोरा आणि अरबाज खान झळकले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत अमृता आणि उस्मानने या कार्यक्रमात हजेरी लावली होती. शकील आणि अमृता यांचे लग्न 2009 मध्ये झाले होते. त्यांना दोन मुलं असून ती अनेकवेळा सोशल मीडियावर कुटुंबियांचे फोटो पोस्ट करत असते. 

शकीलचे अमृतासोबतचे लग्न हे दुसरे असून निशा राणा हे त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव आहे. २००६ मध्ये त्याने निशासोबत घटस्फोट घेतला होता. 


Web Title: Malaika's sister Amrita Arora dating Pak origin cricketer Usman Afzal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.