Malaika Arora's workout photo goes viral on Social media, have you seen? | मलायका अरोराचा वर्कआऊट फोटो सोशल मीडियावर व्हायरल, तुम्ही पाहिला का ?
मलायका अरोराचा वर्कआऊट फोटो सोशल मीडियावर व्हायरल, तुम्ही पाहिला का ?

सुंदर दिसणं आणि उत्तम आरोग्य असणं कोणाला बरं नाही आवडणार..... या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात आरोग्य उत्तम राखणं सगळ्यात कठीण काम... मात्र सा-यांच्या या अडचणी आता दूर होणार आहेत.. कारण  छैय्या छैय्या गर्ल मलायका अरोरा नेहमीच तिच्या वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे इतरांना प्रेरणा देत असते. ती  फिटनेस फ्रिक आहे हे जगजाहीर आहे. तिचा एक नवीन फोटो समोर आला आहे. मलायका ही चोखदंड आहे. ती जे काही करते त्यात काही ना काही खासियत असतेच. तिचा व्हायरल झालेल्या फोटोत याची प्रचिती येईल. फोटोत ती वरं डोकं खाली पाय अशा रितीने वर्कआऊट करताना पाहायला मिळत आहे. 


वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही मलायकाचे फिटनेस प्रेम पाहून भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल. तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून यावर खूप सारे कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 45 वर्षांच्या  वयातही स्वत:ला खूप चांगले फिट ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा बिकिनी अवतार तिने शेअर केला होता तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना कमालीचा आवडला असून काहीच तासांत या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत. तुर्तास मलायका हा नवीन वर्कआऊट फोटो इतरांनाही प्रेरणा देईल हे मात्र नक्की. उत्तम आरोग्याचा कानमंत्र देणा-या मलायकाने या वर्षात काही तरी वेगळं करण्याचं ठरवलंय.. मात्र त्यासाठी तिच्या फॅन्सना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

 


Web Title: Malaika Arora's workout photo goes viral on Social media, have you seen?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.