ठळक मुद्दे मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय.

अभिनेत्री मलायका अरोराचा हॉटनेस आणि फिटनेस दोन्ही चर्चेत असतात. सोशल मीडियावर स्वत:चे हॉट फोटो टाकून मलायका एकीकडे चाहत्यांना घायाळ करते, दुसरीकडे तिचे फिटनेस व्हिडीओ पाहून लोकांना कुतूहल वाटते. अनेकदा ती तिचे जिम आणि योगा व्हिडीओ सुद्धा शेअर करताना दिसते. सोशल मीडियावर सक्रिय असणा-या मलायकाने नुकतेच काही योगा पोझ शेअर केल्यात आणि नेटकरी क्रेझी झालेत.
कपोतासनाचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. तिची ही परफेक्ट योगमुद्रा पाहून चाहते फिदा झाले नसतील तर नवल.  या पोस्टसोबत मलायकाने हे आसन करण्याची योग्य पद्धतही सांगितली.  तिच्या या फोटोवर सध्या कमेंटचा अक्षरश: पाऊस पडत आहे.  


‘ माझ्या फिटनेसचा सर्वात मोठा नियम हा आहे की सुट्टी असो किंवा नसो वर्कआउट थांबता कामा नये. तुमच्या बिझी शेड्युलमध्ये कोणत्याही वर्कआउटला थोडा वेळ नक्की द्यायला हवा. या आठवड्याची सुंदर सुरुवात. या आसनाचे नाव आहे मोडिफाइड रिक्लाइंड कपोतासन’, असे कपोतासनाचा फोटो शेअर शेअर करताना मलायकाने लिहिले आहे.
याआधीही योगा करतानाचे अनेक फोटो व व्हिडीओ मलायकाने शेअर केले आहेत. तेव्हा पाहा तर मलायकाचे परफेक्ट योगा पोजमधील परफेक्ट फोटो...

 

 मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. अर्जुन मलायकापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. यावरून मलायका अनेकदा ट्रोलही झाली. पण मलायकाने या ट्रोलिंगची कधीच पर्वा केली नाही. सध्या ती आपल्या जगात आनंदी आहे. लवकरच हे कपल लग्न करणार असे मानले जात आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: malaika arora yoga pics malaikas fitness photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.