ठळक मुद्देमलायका आणि अर्जुन दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि लवकरच लग्न करणार असल्याचंही बोलले जात आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun kapoor)यांचे नाते आता जगापासून लपून राहिलेले नाही. मलायका व अर्जुन आता अगदी खुल्लमखुल्ला फिरताना दिसतात. दोघांच्या कुटुंबानेही हे नाते स्वीकारले आहे. आता प्रतीक्षा आहे ती केवळ या कपलच्या लग्नबेडीत अडकण्याची. तर आता कदाचित त्याचीही तयारी सुरु झाली आहे. होय, मलायका अरोराने शेअर केलेल्या एका फोटोमुळे त्यांच्या लग्नाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. ( Malaika Arora Flaunts Her Beautiful Diamond Ring )

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मलायकाने स्वत:चे दोन फोटो शेअर केलेत आणि यानंतर मलायका व अर्जुनची एन्गेजमेंट झाल्याची चर्चा सुरु झाली. होय, या फोटोत मलायकाच्या बोटातील रिंग स्पष्ट दिसतेय. ‘किती सुंदर अंगछी आहे. मला ही खूप आवडते. येथून आनंदाला सुरूवात होते. आयुष्यातल्या प्रेमासाठी काही प्लान असेल तर ही साखरपुड्याची अंगठी एकदम मस्त आहे,’ असे या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये मलायकाने लिहिले.
मलायकाच्या या पोस्टनंतर तिने व अर्जुनने साखरपुडा केल्याची चर्चा सुरू झाली. चाहत्यांनी मलायकावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला.

तुम्हीही मलायका व अर्जुनला शुभेच्छा देण्याच्या तयारीत असाल तर जरा थांबा. कारण एन्गेजमेंट वगैरे काहीही नसून हे केवळ एका ब्रँडचे प्रमोशन आहे. होय, तूर्तास तरी मलायका व अर्जुनने एन्गेजमेंटबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. शिवाय मलायकाने तिच्या एकटीचाच हा फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये अर्जुन कुठेच नाही. तेव्हा हा फक्त ब्रँड प्रमोशन फोटो असल्याचे म्हटले जातेय.

मलायका आणि अर्जुन दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि लवकरच लग्न करणार असल्याचंही बोलले जात आहे. अर्जुन आणि मलायकाने कधीच अगदी उघडपणे आपल्या नात्याची कबुली दिली आहे. साहजिकच  चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. मलायकाने आता अंगठी घालून फोटो शेअर केल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. मलायका आणि अर्जुन यांच्यात वयाचा बराच फरक आहे. मलायका  47 वर्षांची आहे तर अर्जुन 35 वर्षांचा आहे. यावरून दोघेही अनेकदा ट्रोलही होतात. पण दोघांनाही याची मुळीच पर्वा नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: malaika arora wore engagement ring and fans congratulate to actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.