"छैय्या छैय्या" गाण्यासाठी मलायका अरोरा नाही, तर 'या' मराठी अभिनेत्रीला देण्यात आली होती पहिली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 07:31 PM2020-11-20T19:31:23+5:302020-11-20T19:36:22+5:30

शिल्पा शिरोडकरने अवघ्या 20 व्या वर्षी आपल्या करियरची सुरुवात केली होती. आपल्या अभिनयाची कौशल्ये आईकडून मिळालेली आहेत. तिची आजी मीनाक्षी देखील मराठी सिनेमांची धाडसी अभिनेत्री होती.

Malaika Arora was not the first choice for the song "Chaiya Chaiya", the first offer was given to Marathi Actress Shilpa Shirodkar | "छैय्या छैय्या" गाण्यासाठी मलायका अरोरा नाही, तर 'या' मराठी अभिनेत्रीला देण्यात आली होती पहिली ऑफर

"छैय्या छैय्या" गाण्यासाठी मलायका अरोरा नाही, तर 'या' मराठी अभिनेत्रीला देण्यात आली होती पहिली ऑफर

googlenewsNext

'दिल से' या सिनेमात शाहरुख खान, मनिषा कोईराला यांच्या मुख्य भूमिका होत्या. मात्र शाहरुख आणि मनिषापेक्षाही मलायका अरोरावरच सारे फिदा झाले. आपल्या ‘दिलखेचक अदा’ आणि ‘लटके झटके’ यांनी कोट्यावधी रसिकांच्या काळजात अढळ स्थान प्राप्त केलेली  छैय्या छैय्या गर्ल अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते. या गाण्याने अशी काही जादू केली की सारेच मलायकाच्या प्रेमात पडले. एका ट्रेनच्या छतावर हे गाणे चित्रित करण्यात आले होते. चालत्या ट्रेनवर मलायका आणि शाहरुखच्या डान्सने रसिक फिदा झाला होता. आजही मलायका नाव घेताच हे गाणे डोळ्यासमोर तरळले नाही तरच नवल.

या गाण्यासाठी मलायका ही पहिली पसंती नव्हती तर शिल्पा शिरोडकरला या गाण्याची पहिली ऑफर देण्यात आली होती. मलायकाच्या जागी शिल्पा या गाण्यात ठुमके लावणार होती पण शिल्पाच्या वाढलेल्या वजनामुळे तिच्या हातातून ती संधी गेली. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असतानाच शिल्पाला वाढत्या वजनाने दगा दिला. काहीही केले तरी तिला वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवणे शक्य होत नव्हते. शिल्पा शिरोडकर आज 51 वर्षांची झाली आहे. 20 नोव्हेंबर 1969 रोजी शिल्पाचा मुंबईत मराठी कुटुंबात जन्म झाला. 

 

शिल्पाने अवघ्या 20 व्या वर्षी आपल्या करियरची सुरुवात केली होती. आपल्या अभिनयाची कौशल्ये आईकडून मिळालेली आहेत. तिची आजी मीनाक्षी देखील मराठी सिनेमांची धाडसी अभिनेत्री होती. गोविंदा, सुनील शेट्टी, अमिताभ, मिथुन आणि अक्षय कुमार या मोठ्या कलाकारांसोबत काम करणारी शिल्पा आता सिनेमांपासून दूर आहे आणि काळानुसार तिच्या लूकमध्येही बदल झाला आहे. शिल्पा 2010 मध्ये आलेल्या 'बारुद' या सिनेमात शेवटची झळकली होती. ब-याच काळापासून शिल्पा बॉलिवूडपासून दूर आहे. लग्नानंतर ती संसारात रमली. 


11 जुलै 2000 रोजी शिल्पाने यूके येथील बँकर अपरेश रंजीतसोबत लग्न केले. 2003 साली तिने मुलगी अनुष्काला जन्म दिला. 2000 साली लग्न झाल्यावर ती लंडनमध्ये शिफ्ट झाली पण आता ती  मुंबईत परतली आहे. मध्यंतरी टीव्ही मालिकांमध्ये शिल्पा झळकली होती. 

Web Title: Malaika Arora was not the first choice for the song "Chaiya Chaiya", the first offer was given to Marathi Actress Shilpa Shirodkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.