ठळक मुद्देतूर्तास मलायका ‘सुपरमॉडल ऑफ द इअर’ हा शो जज करतेय.

मलायका अरोरा तिच्या फिटनेसची किती काळजी घेते, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. म्हणूनच मलायका फिटनेस क्वीन म्हणून ओळखली जाते. नुकताच मलायकाने तिचा एक फिटनेस व्हिडीओ शेअर केला. पण हे काय? हा व्हिडीओ शेअर करताच मलायका ट्रोल झाली.
या व्हिडीओत मलायका डायनिंग टेबलवर बसलेली दिसतेय. तिच्यासमोर काही डिश आहेत. तुम्ही स्वत:ला कसे फिट ठेवू शकता, हे मलायका या व्हिडीओत सांगतेय. मात्र तिचा हा फिट राहण्याचा सल्लाच तिला महागात पडला अन् ती ट्रोल झाली. मलायकाचा नो मेकअप लूक, तिचा सडपातळ बांधा कदाचित चाहत्यांना  आवडला नाही.

‘हे भगवान, इसे क्या हो गया है, कोई बिमारी तो नहीं हो गई, इतनी पतली क्यों दिख रही है,’ अशी कमेंट एका युजरने केली. अन्य एका युजरने तर मलायकाला ‘टीबी का मरीज’ म्हणून संबोधले. काहींनी यात अर्जुन कपूरलाही गोवले. ‘अर्जुनने हिच्यात काय पाहिले?’ असा सवाल अनेकांनी केला.

मलायकाच्या नो मेकअप लूकवरूनही युजर्सनी तिला ट्रोल केले. ‘मेकअपविना सेलिब्रिटी खरच खूप भयंकर दिसतात,’ असे काहींनी लिहिले. अन्य एकाने ‘आता तू चित्रपट विसर. तुझे करिअर संपले, असे समज’ अशी प्रतिक्रिया दिली. तर एकाने ‘हड्डीयों का ढेर’ अशा शब्दांत तिला ट्रोल केले. 

तूर्तास मलायका ‘सुपरमॉडल ऑफ द इअर’ हा शो जज करतेय. सध्या ती अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. नुकतेच दोघांनी न्यू इअर एकत्र सेलिब्रेट केले. यादरम्यान एक फोटो मलायकाने शेअर केला होता. यात अर्जुन कपूर मलायकाला किस करताना दिसला होता.

Web Title: malaika arora trolled in latest video user says look like tb patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.