ठळक मुद्देमलायका घटस्फोटित आहे. शिवाय तिच्यापेक्षा अर्जुन  11 वर्षांनी लहान आहे. याऊपरही अर्जुन व मलायका यांची लव्हस्टोरी बहरली.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे बोल्ड आणि हॉट अवतारातील फोटो शेअर करण्यात मलायका आघाडीवर आहे, असे म्हटले तरी चालेल. सध्या अशाच बोल्ड फोटोंमुळे मलायका पुन्हा एकदा चर्चेत आहेत.
मलायकाने ब्ल्यू ड्रेसमध्ये एक नवे फोटोशूट केले. मलायकाने या नव्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. प्रत्येक फोटोत मलायकाच्या ‘खल्लास’ करणा-या अदा चाहत्यांना वेड लावणाºया आहेत. ब्ल्यू कलरचा ड्रेस आणि मोकळ्या केसांमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.


 सध्या मलायका व अर्जुन कपूरच्या लग्नाच्या चर्चाही जोरात आहे. दीर्घकाळापासून मलायका अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. लवकरच हे कपल लग्न करणार असे मानले जात आहे. त्यातच मलायकाने आपल्या ड्रिम वेडिंगचा खुलासा करून या चर्चांना बळ दिले आहे. 


ताज्या मुलाखतीत मलायकाने अर्जुनसोबतचे तिचे ड्रिम वेडिंग कसे असेल ते सांगितले.  माझे ड्रिम वेडिंग बीचवर होणार आणि हे एक व्हाईट वेडिंग असेल. लग्नात मला ... घालायला आहे. माझी गर्लगँग माझी ब्राईड्समेट असेल. ब्राईड्समेटची प्रथा मला मनापासून आवडते, असे ती म्हणाली.


मलायका घटस्फोटित आहे. शिवाय तिच्यापेक्षा अर्जुन  11 वर्षांनी लहान आहे. याऊपरही अर्जुन व मलायका यांची लव्हस्टोरी बहरली. दोघांनीही मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर करत, या नात्याची जाहीर कबुली दिली होती.

या फोटोत मलायका व अर्जुन एकमेकांचा हात हातात घेऊन दिसले होते. याशिवाय दोघांच्या न्यूयॉर्क व्हॅकेशनचे फोटोही व्हायरल झाले होते. अगदी अलीकडे मलायकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अर्जुनने तिला किस करतानाचा फोटो शेअर केला होता. यानंतर तर दोघांच्याही नात्यावर जणु शिक्कामोर्तब झाले होते. 

Web Title: malaika arora stunning photoshoot in pastel blue pant suit goes viral on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.