malaika arora sister amrita slammed people for sharing her covid 19 report on social media | मलायका अरोराचा कोरोना रिपोर्ट झाला लीक; अमृता अरोराची सटकली, लोकांवर बरसली

मलायका अरोराचा कोरोना रिपोर्ट झाला लीक; अमृता अरोराची सटकली, लोकांवर बरसली

ठळक मुद्देमलायकाचा बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूर हाही कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्याने स्वत: सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली होती.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाली. पाठोपाठ मलायका अरोरा हिचा रिपोर्टही पॉझिटीव्ह असल्याची बातमी आली. आधी मलायकाची बहीण अमृता अरोरा हिने मलायका पॉझिटीव्ह आल्याची बातमी शेअर केली. यानंतर खुद्द मलायकानेही  तिला कोरोनाची लागण झाल्याची बातमी शेअर केली आहे. यानंतर अचानक व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक व अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मलायकाचा मेडिकल रिपोर्ट व्हायरल झाला. लोकांनी धडाधड हा रिपोर्ट एकमेकांना फॉरवर्ड करणे सुरु केले. काही लोक तर यावरून मलायकाची खिल्ली उडवतानाही दिसले.

संतापली मलायकाची बहीण

मलायकाचा मेडिकल रिपोर्ट व्हायरल झालेला पाहून आणि यावरून लोक मलायकाची मजा घेत असल्याचे पाहून तिची बहीण अमृता अरोरा जाम भडकली. मलायकाचा मेडिकल रिपोर्ट पोस्ट करण्याचा काय अर्थ? ती एक जबाबदार नागरिक आहे. त्यामुळे ती स्वत:हून तिचा रिपोर्ट जगजाहिर करणार नाही. पण मला कळत नाहीये की, तिचा रिपोर्ट डिस्कस करण्यात कसला आनंद आहे? तिला कोराना कसा व कधी झाला, यावर चर्चा करण्यात काय अर्थ आहे? काही जणांनी लॉफिंग इमोजीसह तिचा मेडिकल रिपोर्ट शेअर केला आहे. ती डिजर्व्ह करते, अशा कमेंटही लिहिल्या आहेत. पण का? अशा शब्दांत अमृताने तिचा संताप व्यक्त केला.

मलायकाचा रिपोर्ट लीक झालाच कसा?


मलायकाचा कोरोना रिपोर्ट लीक झालाच कसा? असा सवालही अमृताने केला़ मलायकाचा कोरोना रिपोर्ट लीक कसा झाला, हा मला पडलेला प्रश्न आहे. डॉक्टर आणि पेशंट यांच्यातील गोपनियतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असेही अमृता म्हणाली.

अर्जुन कपूरलाही कोरोना
मलायकाचा बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूर हाही कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्याने स्वत: सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली होती.

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: malaika arora sister amrita slammed people for sharing her covid 19 report on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.