ठळक मुद्देमलायका व अर्जुन कपूर दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. हे जोडपे लवकरच लग्न करणार असल्याचे मानले जात आहे.

लॉकडाऊनमुळे मलायका अरोरा गेल्या अनेक दिवसांपासून घरात कैद आहे. पण म्हणून तिची चर्चा होणार नाही, असे थोडीच. सोशल मीडियाद्वारे मलायका सतत चाहत्यांच्या संपर्कात आहे. तेवढीच चर्चेतही आहे. कधी ती कुकिंग करतानाचे व्हिडीओ पोस्ट करते. कधी घरात ब्युटी ट्रिटमेंट  घेतानाचे फोटो शेअर करते.आता मलायकाने लॉकडाऊन मूड्समधील फोटो शेअर केले आहेत.
तिने चार फोटोंचा एक कोलाज तयार केला आहे. यात ती वेगवेगळ्या मूडमध्ये दिसतेय.

कधी खोडकर, कधी मस्ती करताना, कधी रिलॅक्स तर कधी चिल करताना. My various stages of lockdown...असे तिने हे फोटो शेअर करताना लिहिले आहे. तूर्तास मलायकाच्या पोस्टवर चाहते वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मलायका अर्जुन कपूरसोबतचे तिचे नाते आणि अरबाज खानसोबतचा घटस्फोट यावर बोलली होती.
‘प्रत्येकाला जीवनात जोडीदार हवा असतो. त्यावेळी अरबाजसह काडीमोड घेऊ नये, असे मला अनेकांनी सुचवले होते. मात्र काडीमोड घेण्याचा आपला निर्णय झाला होता आणि या निर्णयामुळे खूश आहे. 

जे काही झाले ते चांगलेच झाले़. भूतकाळं विसरून जीवनात पुढे जाताना एक चांगला मित्र व जोडीदार मिळाला तर तुम्ही नशीबवान असता. जीवनात आनंदी राहण्याची दुसरी संधी मिळाली, असे तुम्ही समजू शकता,’ असे ती म्हणाली होती.
मलायका व अर्जुन कपूर दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. हे जोडपे लवकरच लग्न करणार असल्याचे मानले जात आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: malaika arora shared her various stages of lockdown collage photo viral-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.