Malaika Arora says, Arbaaz is still part of my life! | मलायका अरोरा म्हणते, अरबाज आजही माझ्या आयुष्याचा भाग!
मलायका अरोरा म्हणते, अरबाज आजही माझ्या आयुष्याचा भाग!
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मलायका अरोरा खान आणि अरबाज खान यांचा म्हणायला घटस्फोट झालाय. पण घटस्फोट झाल्यापासून दोघेही अनेकदा एकत्र दिसले.  अगदी दोन दिवसांपूर्वी मलायका एक्स हसबण्ड अरबाजची बर्थ डे पार्टी एन्जॉय करताना दिसली होती. अरबाजसाठी केक आणि टरबूज घेऊन ती त्याच्या घरी पोहोचली होती.  या सेलिब्रेशनचे फोटो मलायकाने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यामुळे मलायका व अरबाज यांचा घटस्फोट सगळ्यांसाठीच एक ‘कोडे’ ठरतेय. दोघांमध्ये इतके चांगले बॉन्डिंग असताना मलायका व अरबाजने घटस्फोट घेण्याचा निर्णय का घेतला असेल? हे ते कोडे आहे.अलीकडे एका मुलाखतीत मलायका यावर बोलली. अरबाजपासून वेगळे होणे, हा निर्णय सोपा नव्हता. असा निर्णय नेहमीच त्रासदायक असतो. मी सुद्धा त्याला अपवाद नाही. अरबाज व मी दोघेही वेगळे झालो असलो तरी अरबाज आजही माझ्या आयुष्याचा भाग आहे. तो माझ्या कुटुंबाचा भाग आहे. माझ्या मुलाचा बाप आहे. काही गोष्टी एका रात्रीत बदलत नाही. आमच्यात जे काही झाले, ते शेवटपर्यंत आम्हा दोघांमध्येच असेल. कारण ते वैयक्तिक आहे. आम्हाला ते कुणासमोरही सिद्ध करण्याची गरज नाही. अरबाजला भेटणे माझ्या मुलांना आनंद देणारे आहे आणि मुलांना आनंदी पाहून मी सुद्धा आनंदी होते. माझी बहीण अमृतासाठी अरबाज भावासारखा आहे. माझ्या आई वडिलांचा तो मुलगा आहे. जे काही झाले ते आम्ही दोघांत आहे. आम्ही खूप वर्षांपासून परस्परांना ओळखतो. पण आजही अरबाज माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे, असे मलायका म्हणाली.
खान हे आडनाव लावायचे नाही, या निर्णयाबद्दल विचारले असता, असे काहीही नसल्याचे ती म्हणाली. खरे सांगायचे तर मी अजूनही माझ्या सिंगल होण्याबद्दल विचार केलेला नाही. प्रत्यक्षात हे एक कॉन्शिअस डिसीजन नव्हते. जे काही झाले ते कदाचित आॅर्गेनिक्ली असेल. बघूयात, माझे आयुष्य मला कुठे घेऊन जाते, असे ती म्हणाली.Web Title: Malaika Arora says, Arbaaz is still part of my life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.