ठळक मुद्देमलायका सांगते, मी गरोदर असताना देखील काम करणे सोडले नव्हते. एवढेच नव्हे तर मला बाळ झाल्यानंतर देखील केवळ 40 दिवसांत मी पुन्हा काम करायला सुरुवात केली होती.

मलायका अरोरा सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अर्जुन कपूरसोबत अफेअर असून त्या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहायला मिळते. तिचे लग्न अभिनेता अरबाज खानसोबत झाले होते. पण अर्जुनमुळे तिने अरबाजला घटस्फोट दिला. अरबाज आणि तिला एक मुलगा असून तिने नुकतेच तिच्या प्रेगनन्सीच्या अनुभवाविषयी एका मुलाखतीत सांगितले आहे.

नेहा धुपियाच्या नो फिल्टर या कार्यक्रमात तिने नुकतीच हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या दरम्यान तिने आयुष्यातील अनेक गोष्टींविषयी नेहासोबत गप्पा मारल्या आहेत. प्रेगनन्सीमध्ये देखील आराम न करता काम करणे तिने पसंत केले होते असे या मुलाखतीत तिने सांगितले आहे. मलायका सांगते, मी गरोदर असताना देखील काम करणे सोडले नव्हते. एवढेच नव्हे तर मला बाळ झाल्यानंतर देखील केवळ 40 दिवसांत मी पुन्हा काम करायला सुरुवात केली होती. 40 दिवस देखील केवळ मी माझ्या आईच्या सांगण्यावरून आराम केला. तुझ्या बाळाला तुझी गरज आहे त्यामुळे तू घरातच थांबली पाहिजे असे माझ्या आईचे म्हणणे होते. मी 40 दिवसांत लगेचच चित्रीकरण करायला सुरुवात केली.

मलायकाने या मुलाखतीत हे देखील सांगितले की, मी सावळी असल्याने सुरुवातीला इंडस्ट्रीमधील लोकांचा माझ्यासोबत वागण्याचा अनुभव खूपच वेगळा होता. पण नंतर लोकांनी मला स्वीकारले. मलायका एक ट्रेंड डान्सर आहे. वयाच्या चौथ्या वर्षांपासून तिने डान्स शिकायला सुरुवात केली. मलायकामध्ये गेल्या काही वर्षांत बराच बदल झाला आहे. ती आधीपेक्षा अधिक ग्लॅमरस झालीय. एक गोष्ट मात्र कायम आहे, तो म्हणजे, तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास. मलायकाने वयाची चाळीशी ओलांडली असली तरी ती प्रचंड फिट आहे. ती तिच्या ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते. 

मलायका सोशल मीडियावरही सक्रिय आहे. अनेकदा ती स्वत:चे बिकिनी फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. अनेकदा या फोटोंमुळे तिला ट्रोलही केले जाते. पण मलायका कधीच याची पर्वा करत नाही. मलायकाचा हाच बोल्ड अंदाज तिला इतरांपेक्षा वेगळे ठरवतो.

Web Title: Malaika Arora opened the secret of life, said about pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.