ठळक मुद्देमलायका व अरबाज यांनी दोन वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला.

एमटीव्ही सुपर मॉडल ऑफ द इअर हा लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो या महिन्यात ऑन-एअर होतोय. बॉलिवूडची ‘मुन्नी’ मलायका अरोरा या शोची जज आहे. तिच्याशिवाय अभिनेता मिलिंद सोमन, फॅशन डिझाईनर मसाबा गुप्ता हेही हा शो जज करताना दिसणार आहे. तर सुपर मॉडेल उज्ज्वला राऊत मेन्टॉर म्हणून भूमिका साकारणार आहे. शो ऑन एअर होण्यासाठी सज्ज आहे. पण सेटवर म्हणाल तर फार काही ठीक नसल्याचे कळतेय. होय, चर्चा खरी मानाल तर मलायका आणि उज्ज्वला यांच्या कॅट-फाईट सुरु आहे. विशेष म्हणजे, मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान या कॅट-फाईटचे कारण आहे.

पिंकविलाने याबद्दल वृत्त दिले आहे. त्यानुसार, सेटवर मलायका व उज्ज्वला यांच्यात फार काही ऑल-वेल नाही. कॅट-फाईटमुळे दोघींनाही सेटवर वेगवेगळे ठेवावे लागतेय. याचे कारण म्हणजे, अरबाज खान. चर्चेनुसार, अरबाज व उज्ज्वलाच्या इन्स्टाग्राम फ्लर्टिंगमुळे मलायका बिथरली आहे. उज्ज्वला तिच्या क्रू मेंबससोबत तिच्यात व अरबाजमध्ये झालेल्या गोष्टी शेअर करते. नेमकी हीच गोष्ट मलायकाला खटकते आहे.

काही चर्चांनुसार, उज्ज्वला शोमध्ये ‘द मोस्ट टॉक्ड अबाऊट पर्सन’ बनू इच्छिते. अर्थात सर्वांचे लक्ष स्वत:कडे वेधू इच्छिते. याचमुळे तिच्यात आणि अरबाजमधील चर्चा ती सर्वांसोबत शेअर करते.

मलायका व अरबाज यांनी दोन वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला. सध्या मलायकाचे नाव अर्जुन कपूरसोबत जोडले जातेय. दोघांच्या कुटुंबीयांनीही या नात्याला संमती दिली आहे. अरबाजचे म्हणाल तर तो सुद्धा सध्या इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी हिला डेट करतोय. 

Web Title: malaika arora involved in major catfight with super model ujjwala raut due to arbaaz khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.