मलायका अरोराने घेतला भाईजानशी पंगा?, अभिनेत्रीनं केलं असं काही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 11:06 AM2021-09-30T11:06:51+5:302021-09-30T11:07:18+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते.

Malaika Arora got into trouble with her brother, something the actress did | मलायका अरोराने घेतला भाईजानशी पंगा?, अभिनेत्रीनं केलं असं काही

मलायका अरोराने घेतला भाईजानशी पंगा?, अभिनेत्रीनं केलं असं काही

Next

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. कधी ग्लॅमरस भूमिकेमुळे तर कधी रिलेशनशीपमुळे. तसेच मलायका अरोरा बऱ्याचदा फिटनेसमुळेही चर्चेत येत असते. तिने सोशल मीडियावर आपल्या ग्लॅमरस फोटोतून नेटकऱ्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे. ती उत्तम मॉडेलसोबत एक व्यावसायिक महिला आहे. सध्या ती 'सुपर मॉडेल ऑफ द इयर' या रिअ‍ॅलिटी शोमध्ये पहायला मिळते आहे.

'सुपर मॉडेल ऑफ द इयर' शोचे व्हिडिओ बऱ्याचदा व्हायरल होत असतात. मात्र या वेळी शोमध्ये असे काही घडले की, जज काय करत आहेत याची कोणालाच कल्पना नव्हती. सध्या त्यांची ही शैली त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते आहे. चाहत्यांना या शोचा व्हिडीओ आवडत आहे. या व्हिडिओत मलायका अरोरा स्पर्धकाच्या आवडत्या अभिनेत्याची नक्कल करताना दिसत आहे. तो अभिनेता दुसरा कोणी नसून बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान आहे. हो. खरं आहे या व्हिडीओमध्ये मलायका आधी म्हणते की एक एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी फिर मैं खुद की भी नहीं सुनती'. मलायकाची ही शैली पाहून मिलिंद सोमणला देखील हसू आवरले नाही.

मलायका खूप चांगली डान्सर, मॉडेल आणि बिझनेस वुमनसोबत फिटनेस फ्रिकदेखील आहे. ती तिच्या फिटनेससोबत अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत येत असते.

अर्जुन कपूर मलायका अरोरा पेक्षा वयाने १२ वर्षे लहान आहे. मलायका व अर्जुन दीर्घकाळापासून रिलेशनशीपमध्ये आहेत. त्यांचे हे नाते आता त्यांच्या कुटुंबीयांनीही स्वीकारले आहे. अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाने अर्जुन सोबतचे नाते जगजाहीर केले होते.

Read in English

Web Title: Malaika Arora got into trouble with her brother, something the actress did

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app