ठळक मुद्देसोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेली मलायका चाहत्यांची फेवरेट आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या पर्सनल लाईफसोबतच फॅशन सेन्स आणि फिटनेसमुळे चर्चेत असते.  सध्याच्या सर्वाधिक फिट आणि फॅशन सेन्स असलेल्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. नुकतीच मलायकाने ग्लोबल स्पा अवार्डमध्ये हजेरी लावली. यावेळी रेड कार्पेटवरचा तिचा लूक सर्वांना घायाळ करून गेला.


रेड कलरच्या डीप नेक फ्रिल गाऊनमध्ये रेड कार्पेटवर अवतरलेल्या मलायकाला पाहून सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. लाईट मेकअप आणि डार्क रेड लिपस्टिक असा तिचा अंदाज होता.
सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेली मलायका चाहत्यांची फेवरेट आहे. रोज नवे फोटो शेअर करून मलायका चाहत्यांना खल्लास करण्यात कुठलीही कसर सोडत नाही. तिचे हे नवे फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही हे पटेल, तेव्हा पाहा तर, मलायकाच्या ‘कातिल अदा...’

सध्या मलायका व अर्जुन कपूरच्या लग्नाच्या चर्चा जोरात आहे. दीर्घकाळापासून मलायका अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. लवकरच हे कपल लग्न करणार असे मानले जात आहे. त्यातच मलायकाने आपल्या ड्रिम वेडिंगचा खुलासा करून या चर्चांना बळ दिले आहे.

ताज्या मुलाखतीत मलायकाने अर्जुनसोबतचे तिचे ड्रिम वेडिंग कसे असेल ते सांगितले.  माझे ड्रिम वेडिंग बीचवर होणार आणि हे एक व्हाईट वेडिंग असेल. माझी गर्लगँग माझी ब्राईड्समेट असेल. ब्राईड्समेटची प्रथा मला मनापासून आवडते, असे ती म्हणाली होती.  


मलायका घटस्फोटित आहे. शिवाय तिच्यापेक्षा अर्जुन  11 वर्षांनी लहान आहे. याऊपरही अर्जुन व मलायका यांची लव्हस्टोरी बहरली. दोघांनीही मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर करत, या नात्याची जाहीर कबुली दिली होती.

Web Title: malaika arora flaunts her red dress check out the pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.