malaika arora blushes when beau arjun kapoor shows up on the screen | स्टेजवर अर्जुनचा फोटो बघून चक्क लाजली मलायका अरोरा, पाहा व्हिडीओ
स्टेजवर अर्जुनचा फोटो बघून चक्क लाजली मलायका अरोरा, पाहा व्हिडीओ

ठळक मुद्देया इव्हेंटमध्ये मलायकाच्या मिरर ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  

कधी बोल्ड फोटोशूटमुळे तर कधी रिलेशनशिपमुळे चर्चेत राहणारी बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण काय तर अर्जुन कपूर. होय, अर्जुन कपूर व मलायकाचे नाते आता कुणापासूनही लपून राहिलेले नाही. काही महिन्यांपूर्वी दोघांनीही आपले नाते जगजाहिर केले. आता तर अर्जुन व मलायका अगदी खुल्लामखुल्ला फिरताना दिसतात. नुकत्याच एका इव्हेंटमध्ये मलायकाला अर्जुनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. पण हे काय, अर्जुनचे नाव ऐकल्याबरोबर मलायका चक्क लाजली. होय, अर्जुनचे नाव ऐकताच, तिचा चेहरा लाजेने लाल झाला.
मुंबईत पार पडलेल्या फिल्मफेअर अवार्ड सोहळ्यातला हा प्रसंग. या सोहळ्यात मलायकाला ‘दीवा आॅफ द इअर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मलायका पुरस्कार घेण्यासाठी मंचावर गेली आणि नेमकी हीच संधी साधून होस्ट सोफी चौधरी हिने मलायकाला अर्जुनबद्दल प्रश्न केला. ‘ तू तुझ्या एका स्पर्शाने कुणालाही कसे ‘दीवा’ बनवू शकतेस? असा प्रश्न सोफीने केला. यावेळी  बॅकग्राउंडला अर्जुन कपूरचा फोटो होता. अर्जुनचा तो फोटो पाहिल्यावर मलायका चक्क लाजली. मी आता यावर हसू की उत्तर देऊ, असे लाजत लाजत ती म्हणाली. यानंतर ‘तो माझ्यापेक्षा मोठा दीवा आहे,’ असे मलायका म्हणाली. 

मलायकाचे हे उत्तर ऐकून उपस्थितांना हसू आवरेनासे झाले.  या इव्हेंटमध्ये मलायकाच्या मिरर ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  
 मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. अर्जुन मलायकापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. यावरून मलायका अनेकदा ट्रोलही झाली. पण मलायकाने या ट्रोलिंगची कधीच पर्वा केली नाही.

Web Title: malaika arora blushes when beau arjun kapoor shows up on the screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.