ठळक मुद्देमलायकाने तिच्या करिअरची सुरुवात वीजे म्हणून केली होती.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनमुळे चर्चेत आहे. आज मलायकाचा वाढदिवस. आज मलायका 46 वर्षांची झाली. पण या वयातही ती बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींना मात देते. फिटनेससाठी ओळखली जाणारी मलायकाचे हॉट फोटो चाहत्यांना वेड लावतात. दिवसेंदिवस तिच्या सौंदर्यात वाढ होतेय. तिचे आधीचे आणि आत्ताचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही हे पटेल.

मलायका एक ट्रेंड डान्सर आहे. वयाच्या चौथ्या वर्षांपासून तिने डान्स शिकायला सुरुवात केली.
मलायकात गेल्या काही वर्षांत बराच बदल झाला आहे. ती आधीपेक्षा अधिक ग्लॅमरस झालीय. एक गोष्ट मात्र कायम आहे, तो म्हणजे, तिच्या चेहºयावरचा आत्मविश्वास.

मलायका सोशल मीडियावरही सक्रिय आहे. अनेकदा ती स्वत:चे बिकीनी फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. अनेकदा या फोटोंमुळे तिला ट्रोलही केले जाते. पण मलायका कधीच याची पर्वा करत नाही.   मलायकाचा हाच बोल्ड अंदाज तिला इतरांपेक्षा वेगळे ठरवतो.

मलायकाने अभिनेता अरबाज खानशी लग्न केले होते. दोघांची पहिली भेट एका कॉफीच्या जाहिरातीवेळी झाली. अर्थात 19 वर्षांनतर मलायकाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.  

2017 मध्ये मलायकाने अरबाज खानपासून घटस्फोट घेतला. 
अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर तिचे नाव अभिनेता अर्जुन कपूरशी जोडले गेले. आधी मलायकाने हे नाते जगापासून लपवले. पण अलीकडे  मलायका आणि अर्जुनने दोघांनीही ते एकमेकांना डेट करत असल्याची कबुली दिली होती.

 मलायका अर्जुनपेक्षा 11 वर्षांनी मोठी आहे. त्यांच्या वयातील फरकामुळेही त्यांना अनेकवेळा ट्रोल केले जाते. पण मलायकासाठी वय हा केवळ एक आकडा आहे.  

मलायकाने तिच्या करिअरची सुरुवात वीजे म्हणून केली होती. एमटीव्ही चॅनलसाठी ती काम करायची. मलायकाने मॉडेलिंगनंतर अल्बम आणि आयटम नंबरमधून सिनेसृष्टीत प्रवेश केला. तिचे ‘छैंया छैंया’ हे गाणे  आजही चाहत्यांच्या हिट लिस्टमध्ये आहे. मलायकाने आयटम नंबरशिवाय काही सिनेमांमध्ये कामही केले, पण तिला ओळख तिच्या डान्स नंबरमुळेच मिळाली.

Web Title: malaika arora birthday special then and now differences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.