ठळक मुद्देनुकताच मलायकाचा वाढदिवस साजरा झाला होता. या पार्टीत अर्जुन कपूर धम्माल मज्जा करताना दिसला होता.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांची लव्हस्टोरी आता कुणापासूनही लपलेली नाही. दिवसेंदिवस ही लव्हस्टोरी आणखी चर्चेत आहे. 46 वर्षांची मलायका स्वत:पेक्षा 11 वर्षांनी लहान अर्जुनला डेट करतेय म्हटल्यावर या लव्हस्टोरीचा प्रचंड बोभाटा झाला. पण मलायका-अर्जुनने कुणाचीही पर्वा न करता, या लव्हस्टोरीवर शिक्कामोर्तब केले. अगदी जाहिरपणे प्रेमाची कबुली दिली. आता तर हे कपल सर्रास एकमेकांसोबत फिरताना दिसते. 
अलीकडे हे कपल एका क्लिनिकबाहेर दिसले आणि क्षणात क्लिनिकबाहेर पडतानाचे दोघांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेत.

यावेळी मलायका व अर्जुन दोघेही रिलॅक्स मूडमध्ये होते. मलायकाने सिंपल शॉर्ट्स आणि टॉप घातला होता तर अर्जुन कपूर लोअर टीशर्टमध्ये होता. आता अर्जुन व मलायका कोणत्या कारणाने क्लिनिकमध्ये पोहोचले, हे तर माहित नाही. पण त्यांचे फोटो व्हायरल होताच ट्रोलर्स पुन्हा एकदा अ‍ॅक्टिव्ह झालेत.

ट्रोलर्सनी या फोटोंवर वेगवेगळ्या कमेंट देत दोघांना ट्रोल केले. काहींनी मलायका व अर्जुनची खिल्ली उडवली तर काहींनी दोघांना ‘गुडन्यूज’बद्दल विचारले.
आधी दोघांना मुंबईच्या लीलावती हॉस्पीटलबाहेर स्पॉट केले गेले होते. त्याहीवेळी युजर्सनी दोघांना ट्रोल केले होते.

नुकताच मलायकाचा वाढदिवस साजरा झाला होता. या पार्टीत अर्जुन कपूर धम्माल मज्जा करताना दिसला होता. इतकेच नाही तर मलायकाला किस करतानाचा फोटो शेअर करत त्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांचा हा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Web Title: Malaika Arora, Arjun Kapoor snapped together outside a clinic in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.