ठळक मुद्देमलायका व अरबाजने 12 डिसेंबर 1998 रोजी लग्न केले होते. यानंतर चार वर्षांनी अरहानचा जन्म झाला होता.

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट झालाय. घटस्फोटानंतर दोघेही आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे निघून गेले आहेत. पण विभक्त होऊनही यांनी मुलगा अरहानसाठी मलायका-अरबाज सर्रास एकत्र येतात. कालच अरहानचा 17वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला. यावेळीही मलायका व अरबाज हजर होते. हा दिवस खास बनवण्यासाठी या दोघांनीही कोणतीच कसर सोडली नाही.

अरहानच्या वाढदिवसाची जंगी पार्टी झाली. या पार्टीत मलायकाचे संपूर्ण कुटुंब हजर होते. सिनेसृष्टीतील काही सेलिब्रिटीही या पार्टीत दिसले. मलायकाने या पार्टीत काळ्या रंगाचा शिमरी ड्रेस घातला होता. तिची बहीण अमृता अरोरा हिनेही मलायकाशी मिळताजुळता ड्रेस कॅरी केला होता. मलायका तिच्या आईचा हात पकडून तिला सोबत नेताना यावेळी स्पॉट झाली.

या पार्टीला मलायकाचा बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूर दिसला नसला तरीही त्याच्या काकाची म्हणजेच संजय कपूरची मुलगी शनाया कपूर मात्र पार्टीमध्ये सहभागी झाली होती. अनन्या पांडेही या पार्टीला हजर होती.

अरबाजने मुलाच्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अरहान आपल्या मित्रांसोबत पार्टी एन्जॉय करताना दिसतोय. याशिवाय मलायकानेही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. ‘माझा बेबी बॉय 17 वर्षांचा झाला. तू माझी ताकद आणि कमजोरी आहेस अरहान. सर्वाधिक समजूदार आणि प्रेमळ. लव्ह यू ,’ असे मलायकाने हे फोटो शेअर करताना लिहिले.

मलायका व अरबाजने 12 डिसेंबर 1998 रोजी लग्न केले होते. यानंतर चार वर्षांनी अरहानचा जन्म झाला होता. लग्नाच्या 19 वर्षांनंतर 2007 मध्ये या कपलने घटस्फोट घेतला होता. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करतेय.

Web Title: Malaika arora Arbaaz khan come together sans partners for son Arhaan birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.