ठळक मुद्देआधी मलायका व अर्जुनने आपले नाते जगापासून लपवले. पण आताश: दोघेही अगदी बिनधास्त फिरताना दिसतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काल 22 मार्चला लोकांनी जनता कर्फ्यूचे पालन केले. शिवाय टाळ्या व थाळ्या वाजवून कोरोनाशी लढणाºया जिगरबाजांचे आभारही व्यक्त केले. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच काल संध्याकाळी 5 वाजता 5 मिनिटांपर्यंत टाळ्या वाजवून कोरोनाविरोधात लढणारे  डॉक्टर, नर्स, पोलिसांचे आभार मानलेत. अर्जुन कपूरमलायका अरोरा हेही त्यापैकीच एक . होय, यावेळी दोघेही एकमेकांसोबत दिसले. अगदी ‘जनता कर्फ्यू’ असतानाही.


होय, ‘जनता कर्फ्यू’ असतानाही मलायका व अर्जुन एकमेकांना न भेटता राहू शकले नाहीत. मलायका व अर्जुन एकत्र दिसले. आपल्या अपार्टमेंटच्या गॅलरीत दोघेही टाळ्या वाजवून कोरोनाविरोधात लढणा-यांप्रती आभार व्यक्त करताना दिसले. याऊलट अर्जुनची बहीण अंशुला यावेळी एकटी दिसली. तिनेही घराच्या बाल्कनीत येत यावेळी टाळ्या वाजवत आभार व्यक्त केलेत.

मलायका सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. म्हणजेच कोरोनापासून बचावासाठी तिनेही स्वत:ला घरात कोंडून घेतले आहेत. पण असे असले तरी अर्जुनपासून फार काळ लांब राहायला मलायका तयार नाही, असे दिसतेय. कदाचित अर्जुनलाही विरह फार काळ सहन होत नाही.


अर्जुन कपूरमलायका अरोरा  दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. दीर्घकाळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असलेले हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचीही चर्चा आहे. आधी मलायका व अर्जुनने आपले नाते जगापासून लपवले. पण आताश: दोघेही अगदी बिनधास्त फिरताना दिसतात. अर्जून व मलायकाची रोमॅन्टिक केमिस्ट्री सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. सुरुवातीला दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले. पण अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अगदी बिनधास्त अर्जुनसोबत फिरू लागली.

Web Title: malaika arora and arjun kapoor appeared together amid janta curfew claps hands-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.