नीना गुप्ता 80 च्या दशकात वेस्ट इंडीजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्डसोबत नात्यात होत्या त्यांनी लग्न केले नाही. दोघांना एक मुलगी असून मसाबा तिचे नाव आहे. मुलीचा सांभाळ एकट्या नीना यांनी केला आहे.नीना या लग्नाआधीच प्रेग्नंट राहिल्या होत्या. याविषयी त्या मनमोकळेपणाणे अनेकदा मुलाखतीतमध्येही बोलताना दिसतात. आता नीना गुप्ता यांच्यामुळेच हा डॉयलॉग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

खरंतर नीना गुप्ता जेव्हा लग्नाआधी प्रेग्नंट राहिल्या तो काळ असा होता की, अशा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोण फारच वेगळा होता. आता काळ बदलला आहे. अनेकदा नीना त्यांच्या रिलेशनशिपला घेवून आपले मतं मांडताना दिसतात. इतकेच नाही तर नीना गुप्ता यांनी वयाच्या पन्नाशीत लग्न केले आहे. विवेक मेहरासोबत त्यांनी लग्न केले आहे. 


विशेषतः लग्नाआधी आई होणे हा सर्वस्वी नीना गुप्ता यांचा निर्णय असला तरीही, काही गोष्टी त्यांनी आजही खाजगीच ठेवणे पसंत केले आहे. विवाहीत पुरुषाच्या प्रेमात पडु नका असेही मध्यंतरी त्यांनी तरुणांना सल्ला दिला होता. कारण हे मी भोगले आहे. मला माझी चूक सुधारण्याची संधी मिळाली असती तर मी लग्नाविना आई झाली नसती. प्रत्येक मुलाला दोन्ही पालकांची गरज असते. मी मसाबाशी प्रामाणिक होते. यामुळे आमचे नात्यावर कोणताही परिणाम झाला नाही." 31 वर्षीय मसाबा एक फॅशन डिझायनर आहे.

 मसाबानेही मधू मंटेनासह लग्न केले होते. मधू मंटेना हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आहेत. परंतु, 2018 मध्ये मसाबा आणि मधू मंटेना या दोघांमध्ये वाद झाला. त्याचेही वैवाहीक आयुष्यात फार काही सुरळीत सुरु नव्हते. त्यानंतर मसाबाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मधू मंटेनापासून वेगळं होणार असल्याच सांगत घटस्फोट घेतल्याचेही जाहीर केले होते.


मसाबा गुप्तादेखील पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे चर्चा आहेत. सत्यदीप मिश्रासोबत तिचे अफेअर सुरु आहे. सत्यदीपनेही अभिनेत्री अदितीराव हैदरीसह लग्न केले होते. मात्र त्यांचे नाते फार काळ काही टिकले नाही. मध्यंतरी मसाबा अभिनेता सत्यदीप सोबत गोव्यात एकत्र व्हॅकेशन एन्जॉय करत असल्याचे समोर आले होते. गेल्याच वर्षी मार्चमध्ये दोघे गोव्यात फिरायला गेले होते मात्र अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे दोघे तिथेच अडकले होते. अद्याप दोघांनीही आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिलेली नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mai Tumhari Bache Ki Maa Banne Wali Hu know why this dialogue is in limelight due to Neena Gupta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.