‘परदेस’ या चित्रपटामुळे एका रात्रीतून स्टार झालेली अभिनेत्री म्हणजे महिमा चौधरी. पहिल्याच सिनेमात महिमाला बॉलिवूड स्टार शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. बॉक्स ऑफिसवरही महिमाचा पहिला डेब्यू सिनेमा यशस्वी ठरला. पण या यशाचा तिच्या करिअरला फारसा फायदा झाला नाहीच. गेल्या अनेक वर्षांपासून महिमा बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. 


महिमा चौधरीने २००६ साली मुंबईतील आर्किटेक्ट बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. लग्नाच्या काही महिन्यांतच तिने मुलीला जन्म दिला. महिमा लग्नापूर्वीच प्रेग्नेंट होती, अशी चर्चा यानंतर रंगली. पण आता महिमा बॉबीपासून विभक्त झाली आहे. २०१३ मध्ये बॉबी आणि महिमा विभक्त झाले. आता महिमा सिंगल मदर आहे.


लिएंडर पेस याच्यासोबतचे महिमाचे अफेअर चांगलेच गाजले होते. पण महिमाचे मानाल तर पेसने तिला दगा दिला. ‘डार्क चॉकलेट’ या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी महिमाने लिएंडर पेससोबतच्या नात्याविषयी खुलासा केला होता. लिएंडर एक उत्कृष्ट टेनिस प्लेअर आहे. मात्र व्यक्ती म्हणून तो अजिबात चांगला नाही. त्याच्या आयुष्यात दुसरं कुणी आहे, हे कळल्यावर मला मोठा धक्का बसला होता. त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यात काही फरक पडलेला नाही. उलट मी आधीपेक्षा अधिक प्रगल्भ झाले आहे, असे महिमा म्हणाली होती. २००५ मध्ये महिमासोबत रिलेशनशिपमध्ये असताना संजय दत्तची दुसरी पत्नी रिया पिल्लईसोबतही लिएंडरची जवळीक वाढली होती. महिमासोबत ब्रेकअप झाल्यावर लिएंडरने रियासोबत लग्न केले. पण पुढे या दोघांचाही घटस्फोट झाला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mahima chaudhary was in relationship with leander paes gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.