तेलूग  फिल्म इंडस्ट्रिमध्ये या अभिनेत्याचं नावं मोठं आहे. त्याला साऊथ सिने इंडस्ट्रीचा शाहरुख खान असंही म्हटलं जातं. असं असलं तरी, महेश बाबू काही बाबतीत किंग खानलाही मागे टाकतो. मग याचे फॅन्स असो किंवा लाइफ स्टाइल. बॉलिवूडच्या खानांनसह इतर बड्या सेलिब्रिटींनाही महेश बाबू मागे टाकतो महाराष्ट्राचा हा जावाई. आज महेश बाबू आपला वाढदिवस साजरा करतो आहे.

महेश बाबू आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. आज आम्ही तुम्हाला महेश बाबूबाबत माहित नसलेल्या काही खास गोष्टी सांगणार आहोत.


महेश बाबू टॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. महेश बाबून बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, महेश बाबू एका सिनेमासाठी  20 कोटींचे मानधन घेतो.  


महेश बाबूचे स्वत:च पण एक प्रोडक्शन हाऊस आहे ज्यातच्या बॅनर खाली त्याने अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे. 1999मध्ये प्रर्दर्शित झालेल्या 'राजा कुमारुदु' या चित्रपटातून महेश बाबूने अभिनेत्री प्रिती झींटासोबत स्क्रिन शेअर करत आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली.  रिपोर्टनुसार महेश बाबूकडे जवळपास 135 कोटींची प्रॉपर्टी आहे.   2005मध्ये महेश बाबूने मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत लग्न केलं असून त्यांना दोन मुलं आहेत. महेश बाबू आपल्या कुटुंबियांसह हैदराबादमधील आपल्या आलिशान बंगल्यामध्ये राहतो. 


महेश बाबूला कारचा फार शौक असून त्याच्याकडे अनेक महागड्या कार्सचे कलेक्शन आहे. त्यामध्ये Lamborghini Gallardo (3 कोटी रुपये), Range Rover Vogue (1.6 कोटी रुपये), Toyota Land Cruiser (1.25 कोटी रुपये), Mercedes Benz E class (49 लाख रुपये), Audi A 8 (1.30 कोटी रुपये) यांसारख्या महागड्या गाड्या आहेत. 

Web Title: Mahesh babu takes millions of fees for a film, is crazy for this thing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.