ठळक मुद्दे महेश बाबू सोशल मीडियावर व्हॅकेशनचा फोटो शेअर केला आहे'महर्षी' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

महेश बाबूने नुकतेच लंडनमध्ये 'महर्षि'चे शूटिंग पूर्ण केले आहे. त्यानंतर महेश बाबू फॅमिलीसोबत पॅरिसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतोय. फॅमिलीसोबत क्वॉलिटी टाईमस्पेंट करतोय. महेश बाबू सोशल मीडियावर व्हॅकेशनचा फोटो शेअर केला आहे.     


महेशचा 'महर्षी' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. त्याच्या कारकीर्दीतील हा २५वा चित्रपट आहे. सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 


काही दिवसांपूर्वी महेश बाबूचा सिंगापूरमधील मॅडम तुसादमध्ये वॅक्स पुतळा बनवण्यात आला आहे. महेश बाबूसाठीच नव्हे तर मॅडम तुसाद सिंगापूरसाठी ही मूर्ती खूप खास आहे. कारण सिंगापूरच्या बाहेर पहिल्यांदाच एक प्रतिष्ठित पुतळ्याचे अनावरण केले आहे. या पुतळ्याबद्दल महेश बाबू म्हणाला की, हा मेणाचा पुतळा एकप्रकारे माझ्या यशाचा भाग आहे आणि माझ्यासाठी हा सन्मान आहे. महेश बाबूच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर हा पुतळा सिंगापूरमधील मॅडम तुसादमध्ये ठेवण्यात आला. 


१९७९  मध्ये महेश बाबूने तेलगु ‘नींदा’ या सिनेमाच्या सेटवर गेला होता. त्यावेळी दिग्दर्शक नारायम राव यांनी छोट्या महेशसोबत काही सीन शूट केले होते. या सिनेमातील त्याच्या कामाचं चांगलंच कौतुक झालं होतं. त्यानंतर त्याने शंखाखम, बाजार राऊडी, मुगुरु कोडुकुलू आणि नगदाचारी यासारख्या सिनेमात काम केलं. 
 

Web Title: Mahesh Babu is enjoying vacation with family in paris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.