बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित म्हणजे लाखो तरूणांचा प्राण असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. माधुरीच्या एका फक्त हास्यानेच अनेक चाहते घायाळ होत असतात. 51व्या वर्षी आपलं सौंदर्य, ग्रेस आणि एलिगेंसमुळे माधुरी आजही अनेक नवख्या अभिनेत्रींना कॉम्प्लेक्स देत असते. एवढचं नाही तर आजही माधुरी आपल्या फॅशनेबल आणि स्टायलिश फोटोंमधून नवीन जनरेशनला फॅशन गोल्स देताना दिसून येते. माधुरी सोशल नेटवर्किंग साइट्सवर अ‍ॅक्टिव्ह असून आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ती नेहमीच आपले फोटो शेअर करत असते.एथनिक ट्रेडिशनल अंदाजामध्ये तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. साडीततर माधुरीच्या सौंदर्याला चार चाँद लागले आहेत. माधुरी साडीमधले फोटो सोशल मीडियावर अनेक वेळा शेअर करत असते. 


‘टोटल धम्माल’ आणि ‘कलंक’ या चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीने कमबॅक केले आहे. या दोन्ही चित्रपटांना बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आहे. कलंक सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान माधुरीला तिच्या बायोपिक संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.

जर भविष्यात तुझ्यावर बायोपिक तयार करण्यात आला तर त्यात तुझी व्यक्तिरेखा कोणी साकारावी यावर माधुरीने आलिया भटचे नाव घेतले होते. कलंक सिनेमात आलियाने माधुरीसोबत स्क्रिन शेअर केली होती. 


माधुरीने मराठी चित्रपटसृष्टीमध्येही पदार्पण करत 2018मध्ये रेणुका शहाणेसोबत मराठी चित्रपट बकेट लिस्टमध्ये दिसून आली. बकेट लिस्टमध्ये माधुरीने गृहिणीची भूमिका साकारली होती.

Web Title: Madhuri looks gorgeous in saari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.