ठळक मुद्दे‘टोटल धमाल’ हा सिनेमा 22 फेबु्रवारी 2019 रोजी रिलीज झाला होता. हा ‘धमाल’ या फ्रेन्चाइजीचा तिसरा पार्ट होता.

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने आज ‘टोटल धमाल’ केली. होय, आनंदाच्या भरात माधुरी चूक करून बसली. पण नेटक-यांनी मात्र तिची ही चूक नेमकी पकडली. मग काय, माधुरी चांगलीच ट्रोल झाली. सोशल मीडिया युजर्सनी अशा काही प्रतिकिया दिल्यात की, त्या वाचून लोकांचे चांगलेच मनोरंजन झाले.

आता माधुरीने असे काय केले तर, 2 च्या जागी चुकून 21 लिहिले.  माधुरी, अनिल कपूर, अजय देवगण यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘टोटल धमाल’ या सिनेमाला 21 वर्ष पूर्ण झाल्याची पोस्ट माधुरीने ट्विटरवर शेअर केली. सोबत या सिनेमाच्या सेटवरचे काही फोटोही शेअर केलेत. माधुरीची ही पोस्ट पडली आणि नेटकरी एकदम अ‍ॅक्टिव्ह झालेत. कारण माधुरी उत्साहाच्या भरात चूक करून बसली, हे नेटक-यांच्या लगेच लक्षात आले.

‘टोटल धमाल’ला 2 वर्षे पूर्ण झाली असताना माधुरीने चुकून 21 वर्षे लिहिलीत, हे चाणाक्ष युजर्सनी वेळीच माधुरीच्या लक्षात आणून दिले. काहींनी मात्र यावरून माधुरीची जाम मजा घेतली. 21, हम कुछ समझे नहीं, अशी मजेदार प्रतिक्रिया एका युजरने दिली.

अरे मॅम, 21 नहीं 2 साल, असे एका युजरने लिहिले. वापस आ जाईये, आप ‘तेजाब’ के करीब पहुंच गई है,असे एकाने लिहिले. ‘टोटल धमाल’ला 21 वर्षे झालीत असे म्हणणार असशील तर तू 70 वर्षांची झालीस, असे एका युजरने कमेंट केली. एकंदर काय, टाईप करताना चुकली अन् माधुरी स्वत:च फसली.


‘टोटल धमाल’ हा सिनेमा 22 फेबु्रवारी 2019 रोजी रिलीज झाला होता. हा ‘धमाल’ या फ्रेन्चाइजीचा तिसरा पार्ट होता. ‘धमाल’ हा सिनेमा 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर त्याचा दुसरा पार्ट ‘डबल धमाल’ 2011 साली प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
इंद्रकुमार दिग्दर्शित ‘टोटल धमाल’ या सिनेमात माधुरी, अजय देवगण, अनिल कपूर, रितेश देशमुख, इशा गुप्ता, अर्शद वारसी, जावेद जाफरी मुख्य भूमिकेत होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Madhuri Dixit did tweet about film Total Dhamal write 21 years of total dhamaal , trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.