Madhuri Dixit dance on humko aajkal hai intezaar song video viral on internet- | VIDEO : माधुरीचा 'हमको आजकल हैं इंतजार' गाण्यावरील लाइव्ह डान्स अन् अदा पाहून फॅन्स घायाळ

VIDEO : माधुरीचा 'हमको आजकल हैं इंतजार' गाण्यावरील लाइव्ह डान्स अन् अदा पाहून फॅन्स घायाळ

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आपल्या डान्सने आणि अदांनी सर्वांनाच मदहोश करते. माधुरी जेवढी तिच्या अभिनयासाठी लोकप्रिय आहे तेवढीच ती तिच्या डान्ससाठीही आहे. सध्या माधुरीचा एका जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत माधुरी तिच्या फेमस गाण्यावर एका स्पर्धकासोबत डान्स करताना दिसत आहे. बऱ्याच वर्षांनी माधुरीला या गाण्यावर लाइव्ह डान्स करताना पाहून लोक खूश झाले आहेत.

माधुरी दीक्षितचा हा जुना व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. यात ती 'हमको आजकला हैं इंतजार' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ इंडियन स्टर्नस नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलाय. आतापर्यंत या व्हिडीओला २६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. माधुरीचे या डान्सवरील एक्सप्रेशन बघण्यासारखे आहेत.

माधुरी दीक्षितच्या कामाबाबत सांगायचं तर ती कलंक आणि टोटल धमाल सिनेमात दिसली होती. आता ती एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये  जज म्हणून वापसी करणार आहे. डान्स दिवानेच्या नव्या सीझनमध्ये ती दिसणार आहे. क्वारंटाइन कालावधी लक्षात घेता माधुरीने लोकांना त्यांच्यातील टॅलेंट दाखवण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. आता माधुरी लवकरच काही मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Madhuri Dixit dance on humko aajkal hai intezaar song video viral on internet-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.