हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी चित्रपटांपैकी एक असलेल्या 'हम आपके है कौन' या चित्रपटाला   26 वर्षं पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं हिंदी चित्रपटसृष्टीसह रसिकांमध्येही याच्या आठवणी जागवल्या जात आहेत. सलमान खान, माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे, अनुपम खेर, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे, यांनी चित्रपटात साकारलेल्या आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. या चित्रपटात प्रेम आणि निशा ही जोडी लोकांना खूप आवडली होती. त्यासोबतच दोघांची लव्हस्टोरी, चित्रपटातील गाणी आणि त्यावरील सलमान आणि माधुरीचा डान्स लोकांना विशेष आवडला. 

हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन सिनेमा म्हणजे हम आपके हैं कौन. राजश्री प्रॉडक्शनच्या या सिनेमानं त्याकाळी तिकीटखिडकीवरील सगळे रेकॉर्ड मोडित काढले होते. कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित असलेल्या हम आपकै हैं कौन या सिनेमाची कथा प्रत्येकालाच भावली होती. कलाकारांचा दमदार अभिनय, काळजाला भिडणारी कथा, सिनेमाचं संगीत सारंच रसिकांच्या मनात घर करुन गेले. 

 

सलमान खान, माधुरी दीक्षित, मोहनीश बहेल, रेणुका शहाणे, अनुपम खेर, रिमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे यासारख्या दमदार कलाकारांची फौज असलेल्या सिनेमाने रसिकांना अक्षरक्षा वेड लावलं. आजही या सिनेमाची जादू काही कमी झालेली नाही. या सिनेमाच्या निमित्ताने यातील कलाकारांच्या आठवणी आजही जाग्या होतात. या सिनेमात माधुरी आणि सलमानची जोडी रसिकांना विशेष भावली होती. त्यामुळेच त्यांचे सेटवरचे जुने किस्से आणि धम्माल गंमतीजंमती ऐकायला रसिकांना ऐकायला आवडतात. 

असाच एक किस्सा धकधक गर्ल माधुरी दीक्षितने रसिकांसह शेअर केला आहे. या सिनेमात लग्नातलं जुते दो पैसे लो हे गाणं या सिनेमात होतं. याचवेळच्या आठवणी माधुरीने शेअर केल्यात. सलमानचा स्वभाव मुळात खोडकर असा आहे. सेटवर ऑफस्क्रीन तो धम्माल करतो. मात्र ऑनस्क्रीनही तो तितकीच मस्ती करतो. जुते दो पैसे लो या गाण्यात सलमान माधुरीची खोड काढत असल्याचे रसिकांनी पाहिलं होतं.

सलमानचा हा अभिनय असेन असं तुम्हाला वाटलं असावं. मात्र त्यावेळी सलमान खरोखर माधुरीच्या खोड्या काढत होता. खुद्द माधुरीने याबाबत खुलासा केला होता. सलमानचा तो अभिनय नव्हता तर तो खरंच मला सतावत होता आणि माझी खोड काढत होता असं तिने सांगितलं होते. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Madhuri Dixit celebrated 26 years of Hum Aapke Hain Koun Also Revealed Lesser Known Facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.