madhuri dixit and sanjay kapoor to reunite in web series for netflix after 25 years | 25 वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार माधुरी दीक्षित-संजय कपूरची जोडी

25 वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार माधुरी दीक्षित-संजय कपूरची जोडी

ठळक मुद्देही वेबसीरिज एक सस्पेन्स ड्राम आहे. एका सुपरस्टारच्या अवतीभवती फिरणारी कथा यात पाहायला मिळणार आहे.

1995 साली प्रदर्शित ‘राजा’ हा सिनेमा आठवतो? या सिनेमात संजय कपूर व माधुरी दीक्षितची जोडी लीड रोलमध्ये होती. दोघांची ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. आता सुमारे 25 वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. अर्थात मोठ्या पडद्यावर नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर.
माधुरी व संजय कपूर नेटफ्लिक्सच्या एका वेबसीरिजमध्ये एकत्र काम करणार आहे. या वेबसीरिजद्वारे माधुरी डिजिटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू करतेय. संजय कपूरने याआधी काही वेबसीरिजमध्ये काम केले आहे. द गॉन गेम आणि लस्ट स्टोरिज या सीरिजमध्ये संजय कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता. 

संजय व माधुरीच्या या वेबसीरिजचे शूटींग पूर्ण सुरू झालेय. तसे मार्चमध्येच या सीरिजच्या शूटींगला सुरुवात झाली होती. मात्र कोरोनामुळे शूटींग खोळंबले होते.
करण जोहरच्या प्रॉडक्शन अंतर्गत बनणाºया या सीरिजचे दिग्दर्शन श्री राव करतोय. श्री रावने याआधी ‘बार बार देखो’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. अद्याप या सीरिजचे नाव मात्र गुलदस्त्यात आहे.
माधुरी गतवर्षी ‘कलंक’ या सिनेमात झळकली होती. हा भव्यदिव्य सिनेमा बॉक्स आॅफिसवर दणकून आपटला होता.

अशी असेल कथा
ही वेबसीरिज एक सस्पेन्स ड्राम आहे. एका सुपरस्टारच्या अवतीभवती फिरणारी कथा यात पाहायला मिळणार आहे. या सुपरस्टारच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की, तो एका झटक्यात जमिनीवर आपटतो.
 
 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: madhuri dixit and sanjay kapoor to reunite in web series for netflix after 25 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.