सलमानचा मेहुणा जोरात! ‘लवरात्रि’चा ट्रेलर रिलीज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 04:00 PM2018-08-06T16:00:11+5:302018-08-06T16:01:24+5:30

सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा लवकरच ‘लवरात्रि’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतोय. या चित्रपटाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात आला.

Loveratri trailer release aayush sharma warina hussain film | सलमानचा मेहुणा जोरात! ‘लवरात्रि’चा ट्रेलर रिलीज!!

सलमानचा मेहुणा जोरात! ‘लवरात्रि’चा ट्रेलर रिलीज!!

Next

सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा लवकरच ‘लवरात्रि’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतोय. या चित्रपटाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात आला. या ग्रॅण्ड सोहळ्याला बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, सोहेल खान, आयुष शर्माची पत्नी अर्पिता खान असे सगळे हजर होते. सलमानच्या हस्ते  ‘लवरात्रि’चा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. 

या ट्रेलरमध्ये आयुष शर्मा आणि त्याची हिरोईन वरीना हुसैन यांची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. दोघांचाही हा पहिला चित्रपट आहे. पण ट्रेलर पाहिल्यानंतर हा त्यांचा पहिला चित्रपट आहे, यावर विश्वास बसत नाही. गुजरातच्या पार्श्वभूमीवर साकारलेला ‘लवरात्रि’ एक रोमॅन्टिक चित्रपट आहे. ट्रेलरमधून कथेचा थोडाफार अंदाज येतो. कदाचित वरीना गुजरातेत येते आणि येथे तिची भेट आयुषसोबत होते. मग दोघांची मैत्री आणि पुढे प्रेम. पण यासाठी दोघांनीही बऱ्याच  अग्नी दिव्यातून जावे लागते, अशी याची ढोबळ कथा असल्याचे भासते.

अरबाज खान आणि सोहेल खान हे दोघंही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याशिवाय काही प्रसिद्ध टेलिव्हिजन चेहरेसुद्धा या चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकंदरच आता ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा हा ‘लवरात्री’ बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Loveratri trailer release aayush sharma warina hussain film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app