ठळक मुद्देमल्लिका मोठ्या पडद्यावर अ‍ॅक्टिव्ह नाही. पण लाईमलाईटमध्ये राहणे तिला चांगलेच जमते.

बॉलिवूड अभिनेत्री लिसा हेडन हिने फार कमी वेळात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.  दीर्घकाळापासून कुठल्याही बॉलिवूड चित्रपटात झळकली नसली तरी ती सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. सध्या लिसा प्रेग्नंट आहे. लवकरच ती दुस-यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने आई होणार असल्याची बातमी शेअर केली होती. पण आज आम्ही तुम्हाला लिसाबद्दल नाही तर तिच्या बहीणीबद्दल सांगणार आहोत. होय, लिसाच्या बहीणीला पाहिल्यानंतर तुम्ही तिच्यावरून नजर हटवू शकणार नाही.


लिसाच्या बहीणीचे नाव आहे मल्लिका हेडन. मल्लिका लिसा इतकीच सुंदर आहे. सोशल मीडियावर ती सतत स्वत:चे बोल्ड व ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.


मल्लिकाने मॉडेलिंगच्या दुनियेत नाव कमावले. पण सध्या ती मॉडेलिंग सोडून तिची बेस्ट फ्रेन्ड नीना शाहसोबत डीजेचे काम करतेय.


नीनासोबत रोलिंग स्टोन मॅगझिनसाठी तिने फोटोशूटही केले होते.

18 वर्षांच्या वयात मल्लिकाने मॉडेलिंगची सुरुवात केली. क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आणि शेन वॉनसोबत पेप्सीच्या जाहिरातीत ती झळकली होती.


बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या ‘एजेंट विनोद’ या चित्रपटातील ‘आई विल डू द टॉकिंग टूनाईट’ या गाण्यातही ती दिसली होती.

मल्लिकाच्या सौंदर्यावर अनेक जण फिदा आहेत. म्हणूनच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे.
मल्लिका मोठ्या पडद्यावर अ‍ॅक्टिव्ह नाही. पण लाईमलाईटमध्ये राहणे तिला चांगलेच जमते.
फिरणे आणि पार्टी करणे तिला जाम आवडते.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: lisa haydons sister malika haydon hot and bold photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.