ठळक मुद्देचालताना अचानक लीसाचा गाऊन सँडलमध्ये अडकला असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तिच्या या सँडलची हिल चांगलीच मोठी असून त्यामुळे तिला सावरायला देखील त्रास होत आहे. पण तरीही तिने सावरत तिचा रॅम्प वॉक पूर्ण केला असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

बॉलिवूड स्टार आणि मॉडेल लीसा हेडन दुसऱ्यांदा आई होणार आहे. लीसाने काही दिवसांपूर्वी एक फोटो शेअर करत खुद्द ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिने शेअर केलेल्या फोटोत आपल्याला लीसा, तिचा पती डिनो ललवानी आणि मुलगा जॅक यांना पाहायला मिळाले होते. या फोटोत तिचा बेबी बम्प स्पष्ट दिसत होता. लिसा प्रेग्नंट असली तरी आजही ती रॅम्प वॉक करताना दिसत आहे. पण एका रॅम्प वॉकच्या दरम्यान ती पडता पडता वाचली.

लॅक्मे फॅशन वीक 2019 या सोहळ्यात लीसा हेडन फॅशन डिझायनर अमित अग्रवालच्या फॅशन शोची शो स्टॉपर होती. या फॅशन शोसाठी रॅम्प वॉक करताना लीसाने एक पायापर्यंत मोठा गाऊन घातला होता. याच गाऊनमध्ये सँडल अडकून ती पडता पडता वाचली. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर या व्हिडिओत लीसाचे बेबी बम्प आपल्याला दिसत असून ती त्या अवस्थेत रॅम्प वॉक करत असताना दिसत आहे. पण चालताना अचानक तिचा गाऊन सँडलमध्ये अडकला असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तिच्या या सँडलची हिल चांगलीच मोठी असून त्यामुळे तिला सावरायला देखील त्रास होत आहे. पण तरीही तिने सावरत तिचा रॅम्प वॉक पूर्ण केला असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पंजाब केसरीने त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे.

प्रेग्नंट असताना आजवर करिना कपूर, नेहा धुपिया या अभिनेत्रींनी देखील रॅम्प वॉक केला आहे. खरे तर गरोदरपणात रॅम्प वॉक करण्याचा ट्रेंड करिनाने सुरू केला असेच म्हणावे लागेल. 

क्वीन आणि  शौकीन यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी लीसा 2016 मध्ये बॉयफ्रेन्ड डिनो लालवानीसोबत लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर सात महिन्यांनी म्हणजे १७ मे २०१७ रोजी लीसाने मुलाला जन्म दिला होता. मुलासोबतचे अनेक फोटो लीसा सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. लीसा ने 2010 मध्ये ‘आयशा’ या चित्रपटातून आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात सोनम कपूर लीड रोलमध्ये होती.

Web Title: Lisa Haydon Almost Falls On Ramp During Her Walk at Lakme Fashion Week 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.