‘Light-Camera-Action ...’ will start again on the set - Vani Kapoor | सेटवर पुन्हा एकदा सुरू होणार ‘लाईट-कॅमेरा-अ‍ॅक्शन...’-वाणी कपूर

सेटवर पुन्हा एकदा सुरू होणार ‘लाईट-कॅमेरा-अ‍ॅक्शन...’-वाणी कपूर

‘बेल-बॉटम’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू होत असल्यामुळे अभिनेत्री वाणी कपूरच्या आनंदाला पारा उरलेला नाही. वाणीने लॉकडाऊनच्या काळामध्ये अक्षय कुमारचा बेल-बॉटम आणि आयुष्मान खुराणाबरोबर अद्याप नाव न ठरलेली एक प्रेमकथा असे दोन मोठे चित्रपट साइन केले आहेत आणि आता तब्बल पाच महिन्यांनंतर अक्षयबरोबरच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती अतिशय उत्साहाने स्कॉटलंडला निघाली आहे. 

वाणी सांगते, ‘मी पुन्हा एकदा फिल्मसाठी शूटिंग सुरू करतेय हे मला भलतेच जादुई वाटतंय. सेटवर परतण्याच्या या क्षणाची मी अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते आणि आता हे शूटिंग कधी एकदा सुरू होतंय असं मला झालंय. मी मुंबईबाहेर सुद्धा पाच महिन्यांनंतर पडतेय आणि कामासाठी विमानप्रवास करतेय. हे सारं केल्याला एखादा जन्म उलटून गेला असावा असं वाटतंय.’ पॅनडेमिकमुळे मोठा फटका बसल्यानंतर चित्रपटक्षेत्र पुन्हा एकदा रूळावर येण्याची तयारी करतेय याबद्दल वाणी अतिशय खुश आहे. 

ती सांगते, ‘हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच खूप परीक्षेचे ठरले आहे, पण आता आपण नव्या नॉर्मलशी जुळवून घ्यायला हवं आणि त्याची सुरुवात आपण हळुहळू करत आहोत याचा मला आनंद आहे.’ अक्षयबरोबर शूटिंग सुरू करण्याची वाणीला उत्सुकता आहे आणि शूटिंगच्या दरम्यान या सुपरस्टारकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल असं तिला वाटतं. ती म्हणते, ‘मी पहिल्यांदाच अक्षय सरांबरोबर काम करतेय आणि हा अनुभव माझ्यासाठी खास असणार आहे हे मला माहीत आहे. मला माहीत आहे मी त्यांच्याकडून खूप काही शिकणार आहे. आपल्या कलेप्रती त्यांची समर्पित वृत्ती व त्यांचा ध्यास खरोखरंच आदर्श आहे आणि ते आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्त्रोत आहेत. लोकांना आमची जोडी आवडेल अशी आशा आहे.’

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ‘Light-Camera-Action ...’ will start again on the set - Vani Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.