liger first look vijay deverakonda fans go mad as they pour alcohol on poster | हे जरा अतीच झालं! विजय देवरकोंडाच्या पोस्टरला चाहत्यांनी चक्क दारूनं घातली आंंघोळ

हे जरा अतीच झालं! विजय देवरकोंडाच्या पोस्टरला चाहत्यांनी चक्क दारूनं घातली आंंघोळ

ठळक मुद्देविजयच्या ‘लायगर’ या सिनेमाकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा आहेत.  या सिनेमाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे.

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाचा बहुप्रतिक्षीत ‘लायगर’ या सिनेमाचा फर्स्ट लूक काल सोमवारी रिलीज करण्यात आला आणि हा लूक पाहून विजय देवरकोंडाचे चाहते अक्षरश: सैराट झालेत. चाहत्यांनी असे काही केले की, सगळेच थक्क झालेत.
साऊथच्या क्रेजी चाहत्यांनी फटाके फोडले, काहींनी केक कापला, काहींनी या विजयच्या या सिनेमाच्या नावाचा टॅटू काढला. हे कमी की काय म्हणून काही कट्टर चाहत्यांनी चक्क ‘लायगर’च्या पोस्टरला दारूने आंघोळ घातली. क्रेजी फॅन्सच्या या एकापेक्षा एक भारी प्रतापाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 विजय देवरकोंडा हा टॉलिवूडचा मेगास्टार आहे. अर्जुन रेड्डी, गीता गोविंदम, टॅक्सीवाला सारखे अनेक सुपरहिट सिनेमे त्याने दिले आहेत.   याआधी रिलीज झालेला ‘वर्ल्ड फेमस लवर’ हा त्याचा सिनेमा फार कमाल दाखवू शकला नाही. पण याऊपर त्याच्या चाहत्यांची त्याच्याबद्दलची दिवानगी कमी झाली नाही. 

विजयच्या ‘लायगर’ या सिनेमाकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा आहेत.  या सिनेमाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. ‘लायगर’मध्ये विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे आहे.

अनन्या पहिल्यांदाच विजय देवरकोंडा सोबत काम करताना दिसणार आहे. त्या दोघांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय.

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेसह यात  रम्या कृष्णन, रोनित रॉय, विशु रेड्डी, आली आणि गेटअप श्रीनु मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शनसह पुरी जगन्नाथ, अपूर्व मेहता आणि अभिनेत्री चार्मी कौर यांनी केली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: liger first look vijay deverakonda fans go mad as they pour alcohol on poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.