सनी लिओनीच्या अंधकारमय आयुष्यात 'हा' व्यक्ती बनला होता आधारस्तंभ, सलमान शाहरुखही आहेत त्याच्यापुढे फिके

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 02:06 PM2020-09-11T14:06:50+5:302020-09-11T14:11:03+5:30

ज्यावेळी माझं आयुष्य अंधकारमय झालं होतं, त्यावेळी तो माझ्या जीवनात आला. कठीणसमयी अनेकजण तुमच्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतात, अशावेळी डॅनिअल खंबीरपणे माझ्या पाठिशी उभा राहिला.

Lesser known facts about Sunny Leone's Husband | सनी लिओनीच्या अंधकारमय आयुष्यात 'हा' व्यक्ती बनला होता आधारस्तंभ, सलमान शाहरुखही आहेत त्याच्यापुढे फिके

सनी लिओनीच्या अंधकारमय आयुष्यात 'हा' व्यक्ती बनला होता आधारस्तंभ, सलमान शाहरुखही आहेत त्याच्यापुढे फिके

googlenewsNext

माझ्या जीवनात आजवर ज्या काही गोष्टी घडल्या, मग त्या चांगल्या असो किंवा वाईट, त्याच गोष्टींमुळे मी जी आज आहे ती आहे. याच चांगल्या वाईट गोष्टींमुळे माझ्या जीवनात बदल होत गेला असे एका मुलाखतीत बेबी डॉल सनी लिओनेने सांगितले होते.तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले याविषयी बोलतांना तिने सांगितले की, काही गोष्टी आपल्या हातात नसतात त्यांना आपण काहीच करु शकत नाही. 

जसं की मला वाटतं की माझ्या आईवडिलांनी मला कधीच सोडून जाऊ नये. मात्र देवाच्या इच्छेपुढे काहीच चालत नाही. मात्र एक खरं आहे की माझ्या जीवनात जे काही घडलं त्यामुळे माझ्या जीवनात, जगण्यात आमूलाग्र बदल घडला. या चांगल्या वाईट गोष्टींमुळेच माझ्यात बदल घडवला. मात्र खरंच माझ्याकडे जादू असती तर माझ्या आईवडिलांना मी पुन्हा माझ्या आयुष्यात घेऊन आली असती.


खरं सांगायचं तर डॅनिअल माझ्यासाठी खरा आधारस्तंभ ठरला. ज्यावेळी माझं आयुष्य अंधकारमय झालं होतं, त्यावेळी तो माझ्या जीवनात आला. कठीणसमयी अनेकजण तुमच्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतात, अशावेळी डॅनिअल खंबीरपणे माझ्या पाठिशी उभा राहिला. आमची जेमतेम दोन महिन्यांची ओळख होती. मात्र कशाचाही मागचा पुढचा विचार न करता त्याने माझ्या चांगल्या वाईट काळात माझी साथ निभावली. याच वेळी तुम्हाला तुमच्या जीवनातील व्यक्तींची खरी ओळख कळते.

 


मला माझं कुटुंब प्रिय आहे. कुटुंबासाठी जगायला मला आवडते. कुटुंबासाठी वेळ देताना दमछाक होते कधी कधी मात्र त्यातही खरंच खूप वेगळी मजा आहे. दुसरा प्रश्न म्हणजे आईची जबाबदारी तर आपल्या मुलांसाठी म्हणजे आईचं कर्तव्य निभावताना कोणतीही आई त्यातील अडचणींचा कधीच विचार करत नाही. माझं हे मत कदाचित अनेक मातांना पटेल.

 

कारण आई झालात की तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. त्या सोप्या आहेत की अवघड आहेत याचा विचार कोणतीच आई करत नाही. उदाहरणार्थ डायपर बदलणं, बाळाला झोपवणं या गोष्टी आईला कराव्याच लागतात. मग त्या सोप्या कठीण असा विचार कुणीही करत नाही. त्या सगळ्या गोष्टी स्वाभाविक आणि पूर्णतः नैसर्गिक आहेत असं मला वाटतं.

Web Title: Lesser known facts about Sunny Leone's Husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.