ठळक मुद्देथोडी सी बेवफाई एकमेव चित्रपट आहे,ज्यात खय्याम व गुलजार या जोडीने एकत्र काम केले होते.

ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे काल रात्री साडेनऊ वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. खय्याम यांच्या गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. नुरी, रझिया सुलतान, बाजार यासारखे चित्रपट खय्याम यांच्याच संगीताने अजरामर झालेत. त्यांची अशीच काही सदाबहार गाणी...

‘आखिरी खत’ हा राजेश खन्ना यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटातील बहरो मेरा जीवन भी संवारो... या गाण्याचे शब्द कैफी आझमी यांनी लिहिले होते तर खय्याम या गाण्याचे संगीतकार होते. लता मंगेशकर यांनी ते गायले होते.

खय्याम यांनी ‘कभी कभी’ या सिनेमाला संगीत दिले होते. या चित्रपटाने तीन फिल्मफेअर जिंकलेत. बेस्ट लिरिक्स, बेस्ट म्युझिक आणि बेस्ट प्लेबॅक सिंगर असे हे तीन पुरस्कार.

रेखा यांचे ‘उमराव जान’ या चित्रपटाचे संगीतही खय्याम यांनी दिले होते. या चित्रपटासाठी खय्याम हे  दिग्दर्शकाची पहिली पसंत नव्हते. खय्याम यांच्याआधी या चित्रपटासाठी दुस-याच संगीत दिग्दर्शकास साईन करण्यात आले होते. पण दिग्दर्शकाचे त्याच्यासोबत मतभेद झालेत आणि त्यामुळे ऐनवेळी खय्याम यांची निवड केली गेली होती.

‘फिर सुबह होगी’साठी साहिर लुधियानवी यांनी खय्याम यांची शिफारस केली होती.

1981 हे वर्ष खय्याम यांच्यासाठी शानदार राहिले. या वर्षी त्यांचे तीन अल्बम हिट झाले होते. कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता हे त्यांनी संगीतबद्ध केलेल्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे.

थोडी सी बेवफाई एकमेव चित्रपट आहे,ज्यात खय्याम व गुलजार या जोडीने एकत्र काम केले होते. आजही या चित्रपटाची गाणी श्रोत्यांना मनात जिवंत आहेत.

Web Title: legendary composer khayyam passed away 10 best songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.