बाबो..! लक्झरी गाडी सोडून दिशा पटानीनं चक्क रिक्षानं केला प्रवास, फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 01:15 PM2021-01-11T13:15:06+5:302021-01-11T13:15:31+5:30

दिशा पटानी आपल्या लक्झरी कारऐवजी रिक्षात प्रवास करताना दिसली.

Leaving the luxury car, Disha Patani traveled in a rickshaw, the photo is going viral | बाबो..! लक्झरी गाडी सोडून दिशा पटानीनं चक्क रिक्षानं केला प्रवास, फोटो होतोय व्हायरल

बाबो..! लक्झरी गाडी सोडून दिशा पटानीनं चक्क रिक्षानं केला प्रवास, फोटो होतोय व्हायरल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. कधी टायगर श्रॉफमुळे, तर कधी आदित्य ठाकरेंसोबतच्या मैत्रीमुळे तर कधी हॉट फोटो व व्हिडीओंमुळे. मात्र आता ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतेच दिशा पटानीने वर्सोवा येथे एका जाहिरातीचे शूटिंग केले. शूटिंग संपल्यानंतर तिने आपल्या महागड्या कारऐवजी चक्क रिक्षाने प्रवास केला. 

बॉलिवूडमधील अनेक कलाकार रिक्षात बसताना दिसले आहेत. ते आपली महागडी कार सोडून रिक्षात प्रवास करणे पसंत करतात. दिशा पटानीदेखील आपल्या लक्झरी कारऐवजी रिक्षात प्रवास करताना दिसली.

 तिला एका ऑटो रिक्षात बसल्याचे पाहून फोटोग्राफर्सनी ते क्षण कॅमेऱ्यात टिपले. फोटोमध्ये दिशा पटानी काळ्या रंगाचा टॉप आणि ट्राउजरवर दिसले. तिने चेहऱ्याला मास्कही लावला होता.


दिशा आणि टायगर श्रॉफ दोघांच्या प्रेमाच्या खुमासदार चर्चा रंगतात. दोघांनी कधीही होकार किंवा नकार दिला नाही.दिशा पटानी टायगरसह दिसत नसली तरी टायगरची बहिण कृष्णा श्रॉफ तिची खास मैत्रीण आहे.टायगर आणि दिशा यांनी कधीच त्यांच्या नात्याबाबत जाहीर कबुली दिली नाही.दोघेही याला खास मैत्री म्हणत असून माध्यमांसमोर मात्र त्यांचं नातं लपून राहिलेलं नाही. मागील महिन्यात नोव्हेंबरमध्ये दोघे मालदीव व्हॅकेशनला गेले होते. यावेळी दोघांनी स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.


दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर दिशा पटानी शेवटची मलंग चित्रपटात दिसली होती. आता ती 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई'मध्ये दिसणार आहे.यात ती सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी भेटीला येणार आहे.


यासोबतच, दिशा लवकरच 'एक विलेन 2' मध्ये दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन 'मलंग'चा दिग्दर्शक मोहित सूरी करणार आहे.

Web Title: Leaving the luxury car, Disha Patani traveled in a rickshaw, the photo is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.