Learn more about Sunny Leone, featured in the Kamasutra web series | कामसूत्रावर आधारित वेब सीरिजमध्ये झळकणार सनी लिओनी, जाणून घ्या याबद्दल

कामसूत्रावर आधारित वेब सीरिजमध्ये झळकणार सनी लिओनी, जाणून घ्या याबद्दल

अभिनेत्री सनी लिओनी बऱ्याच वर्षापासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. जिस्म २, रागिनी एमएसएस २ आणि जॅकपॉट सारख्या चित्रपटात अभिनय केल्यानंतर सनीनं अभिनयापेक्षा आयटम साँग्स जास्त केले. तिने तिच्या सौंदर्य व डान्सच्या कौशल्यानं बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. आता ती लवकरच एका वेबसीरिजमध्ये झळकणार असल्याचं समजतंय. सूत्रांच्या माहितीनुसार, ही वेबसीरिज कामसुत्रावर आधारीत आहे.

अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, या वेब सीरिजची निर्मिती एकता कपूर करणार आहे. कामसूत्रावर आधारित वेब सीरिजच्या निर्मितीबाबत एकता आणि सनीमध्ये चर्चा सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.

‘रागिनी एमएमएस २’ चित्रपटानंतर एकता आणि सनी ही जोडी तब्बल ५ वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम करणार आहे. सनीने कामसुत्रावर आधारित वेब सीरिजची स्क्रीप्ट वाचली असून तिने या भूमिकेसाठी होकार कळवला आहे. राजस्थानमधील गोली समाजातील एका महिलेची भूमिका सनी या वेब सीरिजमध्ये करताना दिसणार आहे. आता चाहत्यांमध्ये या वेब सीरिजची उत्सुकता वाढली आहे.


या वेबसीरिज व्यतिरिक्त सनी लिओनीकडे एक मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट एक तमीळ बायोपिक आहे. वीरमादेवी नामक योद्धेवर आधारीत चित्रपटात याच प्रसिद्ध योद्धेची कथा रेखाटण्यात आली आहे. या चित्रपटात सनी लिओनी वीरमादेवीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Learn more about Sunny Leone, featured in the Kamasutra web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.