Lata Mangeshkar’s pictures from hospital go viral | लता मंगेशकर यांचा रुग्णालयातील फोटो व्हायरल, दिसतायेत खूपच अशक्त
लता मंगेशकर यांचा रुग्णालयातील फोटो व्हायरल, दिसतायेत खूपच अशक्त

ठळक मुद्देलता मंगेशकर यांचा रुग्णालयातील एक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या फोटोत लता मंगेशकर खूपच अशक्त दिसत असून लवकरात लवकर तुमची तब्येत चांगली होऊ दे असे त्यांचे फॅन्स कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना २८ दिवसांच्या उपचारानंतर ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून नुकतेच घरी सोडण्यात आले. त्यांनीच ट्विटरद्वारे त्यांच्या चाहत्यांना याविषयी सांगितले होते. त्यांनी चाहत्यांचे आभार मानून सर्वांना त्या सुखरूप असल्याचे कळवले होते. त्यांचे हे ट्वीट पाहून त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला होता.  

लता मंगेशकर यांचा रुग्णालयातील एक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या फोटोत लता मंगेशकर खूपच अशक्त दिसत असून लवकरात लवकर तुमची तब्येत चांगली होऊ दे असे त्यांचे फॅन्स कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. या फोटोत आपल्याला त्यांच्यासोबत ब्रीच कँडी रुग्णालयातील नर्सेस पाहायला मिळत आहेत. 

लता मंगेशकर यांनी ट्वीटमध्ये लिहिले होते की, ‘नमस्कार. गेल्या २८ दिवसांपासून मी ब्रीच कँडी रूग्णालयामध्ये होते. मला न्युमोनिया झाला होता. प्रकृती पूर्णपणे ठीक झाल्यानंतरच मी घरी जावं, अशी डॉक्टरांची इच्छा होती. आज मी घरी आले आहे. ईश्वर, आईवडिलांचे आशिर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि प्रार्थनांमुळे मी आता ठीक आहे. मी तुम्हा सगळ्यांची मनापासून आभारी आहे. ब्रीच कँडीमधील डॉक्टर खरच देवदूत आहे. तेथील सर्व कर्मचारी खुपच चांगले आहेत. तुम्हा सगळ्यांचे मी पुन्हा मनापासून आभार मानते. हे प्रेम आणि आशिर्वाद असेच राहू द्या,’  

लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे १२ नोव्हेंबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू होते. रविवारी लता मंगेशकर यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 

Web Title: Lata Mangeshkar’s pictures from hospital go viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.