ठळक मुद्दे‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित करणार आहे.

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटानंतर सुपरस्टार आमिर खानचा  बहुप्रतिक्षीत सिनेमा ‘लाल सिंग चड्ढा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालेय आणि आमिरच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. पण आता आमिरचा नवा लूक पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे. होय, सोशल मीडियावर आमिरचा हा नवा लूक व्हायरल झाला आहे. आमिरने अधिकृतपणे हा लूक शेअर केलेला नाही. पण सोशल मीडियावर काही फॅन पेजवर त्याचे नव्या लूकमधील फोटो शेअर केले गेले आहेत.
या फोटोंमध्ये आमिर लांब दाढी आणि लांब केसांमध्ये दिसतोय. त्याच्या डोक्यावर कॅप आहे. हे फोटो पहिल्या नजरेत तुम्ही ओळखूही शकणार नाहीत, त्यामुळेच सध्या ते तुफान व्हायरल होत आहेत.

आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक आहे. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते.

‘लाल सिंग चड्ढा’या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटात आणीबाणीपासून, कारगिल युद्ध, पुलवामा हमला, उरी हमला, तेव्हापासून आतापर्यंत बदललेली अनेक सरकारं या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.  या सिनेमात आमिरसोबत करीना कपूरसुद्धा दिसणार आहेत. करीना कपूरचा या चित्रपटातील फोटो अलीकडे लीक झाला होता. त्यात ती देसी लूकमध्ये दिसली होती. 

‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित करणार आहे. लाल सिंग चड्ढा चित्रपटातून आमिर खान दोन वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. शेवटचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये झळकला होता. ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट पुढील वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: laal singh chaddha aamir khan new look viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.