ठळक मुद्देकुणालने 2015 मध्ये सोहा अली खानसोबत लग्न केले.

बॉलिवूड स्टार्स अनेकदा बालपणीचे फोटो शेअर करतात. अनेकदा हे फोटो पाहून चाहतेही आपल्या आवडत्या स्टारला ओळखू शकत नाही. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. फोटोत कुर्ता-पायजामा घातलेला एक चिमुकला खुर्चीवर उभा दिसतोय. फोटोतील हा चिमुकला कोण, सांगू शकाल? हा चिमुकला अन्य कुणी नसून सैफ अली खानचा जवळचा नातेवाईक आहे. होय, फोटोतील हा चिमुकला अन्य कुणी नसून सैफचा जावई कुणाल खेमू आहे. म्हणजेच सैफची बहीण सोहा अली खानचा पती.


बॉलिवूड अभिनेता कुणाल हा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. अनेकदा रिअल आणि रिल लाईफचे फोटो तो शेअर करत असतो. मंगळवारी त्याने आपल्या बालपणीचा फोटो शेअर केला. ‘फ्लॅशबॅक, हा चिमुकला लक्ष वेधून घेणार नाही पण हा टीव्ही प्रत्येकाचे लक्ष वेधून घेईल,’असे हा फोटो शेअर करताना त्याने लिहिले.


कुणाल खेमूने बालकलाकार म्हणून आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरूवात केली होती. ‘गुल गुलशन’ या दूरदर्शनवरील शोमध्ये तो बालकलाकार म्हणून झळकला होता. यानंतर राजा हिंदुस्तानी, जख्म, भाई, हम हैं राही प्यार के अशा अनेक चित्रपटात बालकलाकार म्हणून तो दिसला. २००५ मध्ये कलयुग या चित्रपटातून त्याने लीड अ‍ॅक्टर म्हणून डेब्यू केला. अलीकडे कुणाल ‘कलंक’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याची अगदीच छोटी भूमिका होती.


कुणाल खेमूने 2015 मध्ये सोहा अली खानसोबत लग्न केले. ‘ढुंढते रह जाओगे’च्या सेटवर सोहा व कुणाल एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांना इनाया नावाची एक मुलगी आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kunal kemmu childhood flashback viral photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.