ठळक मुद्देकुमार सानू यांनी दोनदा लग्न केले आहे.  रीता हे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव होते.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. आता बॉलिवूडचे लोकप्रिय गायक कुमार सानू यांच्या मुलाचेच उदाहरण घ्या. सध्या कुमार सानूचा मुलगा त्याच्या नावामुळे ट्विटरसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चर्चेचा विषय बनला आहे. आता त्याच्या नावात असे काय आहे की तो ट्रेंड होतोय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
कुमार सानू यांच्या मुलाचे नाव जान कुमार सानू आहे. मात्र इन्स्टाग्रामवर एका युजरने या नावावरून जान कुमार सानूची मजा घेतली.

 ‘बप्पी लाहिरीच्या मुलाचे नाव बप्पा लाहिरी आहे, हे जाणून किती हटके, अशी माझी भावना झाली होती. मात्र आजच मला माहिती झाले की कुमार सानूच्या मुलाचे नाव कुमार जानू आहे,’ असे या युजरने गमतीत लिहिले. मग काय, या युजरच्या पोस्टनंतर कुमार सानूच्या मुलाचे नाव सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले. ही पोस्ट 80 हजारांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केली. ट्विटरवर या ट्विटला 1500 पेक्षा अधिक लोकांनी रिट्विट केले. इतकेच नाही तर ही पोस्ट इतकी व्हायरल झाली की, खुद्द कुमार सानूच्या मुलाला म्हणजेच जान कुमार सानूला यावर उत्तर द्यावे लागले.

काय दिले जान कुमारने उत्तर?


भाई मेरे अक्षर पाठक, मी कुमार सानूचा मुलगा आहे आणि माझे नाव जान कुमार सानू आहे. मीम मत बना दो यार, असे या पोस्टवर उत्तर देताना जान कुमार सानूने लिहिले.

मजेदार रिप्लाय

कुमार सानूच्या मुलाच्या नावावरून लिहिलेली पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकरी जणू सैराट झालेत. यानंतर या पोस्टवर एक ना अनेक मजेदार रिप्लाय केले गेलेत. एका युजरने लिहिले, ‘डिंपल कपाडियाची एक बहीण आहे, तिच नाव सिंपल कपाडिया़’ याशिवायही अनेक युजरनी यावर मजेशीर कमेंट केल्यात.

जान कुमार सानू बिग बॉस 14 मध्ये?
बिग बॉसचे 14 वे सीझन लवकरच सुरु होणार आहे. या सीझनमध्ये कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानूदेखील सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.
जान हा २६ वर्षांचा आहे. परंतु तो त्याच्या नावापुढे कुमार सानू असे वडिलांचे नाव लावतो.  जान कुमार सानूदेखील वडिलांप्रमाणे एक क्लासिकल ट्रेंड सिंगर आहे. जान हा कुमार सानू यांच्या पहिल्या पत्नीचा रीता यांचा मुलगा आहे. तारें जमीं पें या चित्रपटातील बम बम बोले हे गाणे जानने गायले आहे़ काही बंगाली सिनेमासाठीही त्याने गाणी गायली आहेत.

SEE PICS : ग्लॅमरस आहे कुमार सानूची लेक, हॉलिवूडमध्ये आहे मोठे नाव

कुमार सानू यांचे कुटुंब

कुमार सानू यांनी दोनदा लग्न केले आहे.  रीता हे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव होते. कुमार सानू व रिता यांना 1988 साली पहिला मुलगा जैसी झाला. यानंतर जीको व जान अशी आणखी दोन मुले झाली. अर्थात 1994 साली रिता व कुमार सानू यांचा घटस्फोट झाला. तिन्ही मुलांची कस्टडी तिला मिळाली. कुमार सानूची ही तिन्ही मुले लाईमलाईटपासून दूर असतात.
1994 साली कुमार सानू यांनी सलोनी भट्टाचार्यसोबत दुसरे लग्न केले. यांना 3 मुले आहेत. शॅनन, अ‍ॅना या दोन मुली आणि नाल कुमार जानू हा मुलगा.  शॅननला कुमार सानू यांनी काही वर्षांपूर्वी दत्तक घेतले होते.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kumar sanu son jaan kumar sanu replied to a user who was trying to make meme over his name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.