सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गाण्यामुळे लोकप्रिय झालेली गायिका रानू मंडलचं काही दिवसांपूर्वी 'तेरी मेरी कहानी' हे गाणं प्रदर्शित झालं. या गाण्याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियानेच रानूला बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा गाण्याची संधी दिली. त्याच्या आगामी सिनेमा 'हॅप्पी हार्डी अँड हीर'मधील 'तेरी मेरी कहानी' हे गाणं रानूच्या आवजात ध्वनीमुद्रीत करण्यात आलं. या गाण्यानंतर बरेच जण रानू मंडलसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. यामध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचाही समावेश आहे. रानू सोबत काम करण्याची इच्छा नुकतीच त्यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवली. 

 कुमार सानू यांच्या एका म्युझिक अल्बम लाँचच्या कार्यक्रमात त्यांना रानू बद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी कुमार सानू यांनी रानू मंडलचं कौतुक केलं. ते म्हणाले, 'जर कोणी नवा गायक या इंडस्ट्रीमध्ये येत असेल तर आम्हाला आनंदच वाटतो. रानू खूपच चांगलं काम करतील तर त्यांना चांगली ओळख मिळेल. जर मला त्याच्यासोबत काम करण्याचा प्रस्ताव मिळाला तर मी नक्कीच त्यांच्यासोबत काम करेन. हिमेशनं त्यांना त्याच्या सिनेमासाठी काम करण्याची संधी दिल्याचं मी ऐकलं आहे. मात्र त्यांचं गाणं अद्याप ऐकलेलं नाही. येणाऱ्या काळात त्या कसं काम करतात ते पाहूयात.'


रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊन भीक मागणाऱ्या रानू मंडलला हिमेशनं पहिला ब्रेक दिला आणि तिचे एका रात्रीत आयुष्य बदलले. आता तिचं आणखी एक 'आदत' नवं गाणं लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. 'आदत'नंतर रानू मंडल हिमेशसोबत 'आशिकी में तेरी...' साठी सुद्धा काम करणार आहे.

रानू मूळच्या पश्चिम बंगालच्या राणाघाटमधील राहणाऱ्या आहेत.रानू रेल्वे स्टेशनवर गात असतानाच एतिंद्र चक्रवर्ती अनेकदा रानू यांचं गाणं ऐकत असे आणि तिथून जात असे.

एक दिवस त्यानं रानू गात असेलेलं लता मंगेशकर यांचं 'एक प्यार का नगमा' हे गाणं व्हिडीओ शूट केलं आणि हा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आणि हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता.
 

Web Title: Kumar Sanu Ready To Sing Duet With Ranu Mandal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.