ठळक मुद्देकेआरकेने नुकतेच ट्वीट करत लिहिले आहे की, माझ्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत सिंग रजपूतला सध्या कोणत्याही चित्रपटाची ऑफर मिळत नसल्याने तो निराश झाला आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून तो भूमिगत आहे.

काम मिळत नसल्याने हा अभिनेता म्हणजेच सुशांत सिंग रजपूत गायब झालाय हे वाचून तुम्हाला नक्कीच टेन्शन आले असेल ना... पण हे म्हणणे आमचे नव्हे तर केआरकेचे आहे. केआरके त्याच्या ट्वीटसाठी प्रसिद्ध आहे. तो काही ना काही ट्वीट करत बॉलिवूडमधील लोकांवर निशाणा साधत असतो. आता त्याच्या निशाण्यावर अभिनेता सुशांत सिंग रजपूत असल्याचे केआरकेच्या नव्या ट्वीटवरून वाटत आहे.

केआरकेने नुकतेच ट्वीट करत लिहिले आहे की, माझ्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत सिंग रजपूतला सध्या कोणत्याही चित्रपटाची ऑफर मिळत नसल्याने तो निराश झाला आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून तो भूमिगत आहे. तो सध्या कुठे आहे याबाबत कोणालाच काहीही माहीत नाहीये. 

सुशांतने एम एस धोनी, केदारनाथ, काय पो छे यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले असून तो गेल्या वर्षी नेटफ्लिक्सच्या ड्राईव्ह या चित्रपटात झळकला होता. तो सध्या त्याच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून रिया चक्रवर्तीला डेट करत असून सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात.

 

रियापूर्वी सुशांत अंकिता लोखंडेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. या दोघांचे रिलेशनशिप अगदी लग्नापर्यंत पोहोचले होते. पण अनेक वर्षे सोबत राहिल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर सुशांत व क्रिती सॅननच्या रोमान्सच्या चर्चा रंगल्या. क्रितीमुळे सुशांत व अंकिताचे ब्रेकअप झाले, असेही म्हटले गेले. पण कालांतराने हे नातेही संपले. 

केआरकेने हे ट्वीट करून काही तास झाले असले तरी सुशांतने अद्याप यावर काहीही रिप्लाय दिलेला नाहीये. 

Web Title: KRK Takes A Jibe At Sushant Singh Rajput

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.